मेलबर्न: आयसीसीने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष टी-20 विश्वचषक 2022 (The Men's T20 World Cup 2022) स्पर्धेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केली आहे. ही स्पर्धा 2020 मध्ये पार पडणार होती. मात्र कोरोना महामारीने या स्पर्धेला विलंब झाला. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या खांद्यावर असणार आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक 2022 या स्पर्धेला 16 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा शेवटचा सामना 13 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. तसेच संपूर्ण स्पर्धेचे आयोजन हे 2021 च्या स्पर्धेप्रमाणे असणार आहे. तसेच पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान या स्पर्धेच्या माध्यमातून भिडणार आहेत.
-
The fixtures for the ICC Men’s #T20WorldCup 2022 are here!
— ICC (@ICC) January 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
All the big time match-ups and how to register for tickets 👇
">The fixtures for the ICC Men’s #T20WorldCup 2022 are here!
— ICC (@ICC) January 20, 2022
All the big time match-ups and how to register for tickets 👇The fixtures for the ICC Men’s #T20WorldCup 2022 are here!
— ICC (@ICC) January 20, 2022
All the big time match-ups and how to register for tickets 👇
या स्पर्धेत एकूण 16 देशांच्या संघाचा सहभाग असणार आहे. त्यापैकी सुपर 12 संघ (Super 12 Team) या स्पर्धेसाठी थेट पात्र आहेत. तर उर्वरित संघाना आपली पात्रता फेरी खेळून मुख्य स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल. या स्पर्धेतील सलामीचा सामना श्रीलंका आणि नामिबिया याच्यात पार पडेल . त्याचबरोबर सुपर-12 चा पहिला सामना 22 ऑक्टोबरला पार पडेल. हा सामना गतविजेते ऑस्ट्रेलिया (Defending Champion Australia)आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडणार आहे.
-
India and Pakistan meet at the #T20WorldCup again at the MCG in October 👀
— ICC (@ICC) January 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look back at the previous meetings at the tournament 👇https://t.co/sIamnyp0qA
">India and Pakistan meet at the #T20WorldCup again at the MCG in October 👀
— ICC (@ICC) January 21, 2022
A look back at the previous meetings at the tournament 👇https://t.co/sIamnyp0qAIndia and Pakistan meet at the #T20WorldCup again at the MCG in October 👀
— ICC (@ICC) January 21, 2022
A look back at the previous meetings at the tournament 👇https://t.co/sIamnyp0qA
कट्टरप्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना 23 ऑक्टोबरला खेळला जाईल. तत्पुर्वी मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानने प्रथमच आयसीसी स्पर्धेत भारताला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने या स्पर्धेत सहभागी होईल.
असे आहेत गट-
आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर 12 फेरीसाठी इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा ‘गट एक’ मध्ये समावेश आहे. त्याचबरोबर भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश गट दोन मध्ये आहेत. तसेच या दोन्ही गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे प्रत्येकी 2 संघ सामील होणार आहेत.
या ठिकाणी स्पर्धेचे सामने होणार-
ऑस्ट्रेलियातील ऍडलेड, ब्रिस्बेन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या 7 शहरांमध्ये स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. तसेच होबार्टचे बेलेरिव्ह ओव्हल, गिलाँगचे कार्डिनिया पार्क, ऍडलेडमधील ऍडलेड ओव्हल, ब्रिस्बेनमधील द गॅबा, पर्थमधील पर्थ स्टेडियम, सिडनीतील सिडनी क्रिकेट ग्राऊंड आणि मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड या 7 स्टेडियमवर हे सामने होणार आहेत.