ब्रिस्बेन : T20 विश्वचषक सुपर 12 च्या 33 व्या ( T20 World Cup 2022 ENG vs NZ Cricket Match ) सामन्यात आज जॉस बटलरच्या ( Jos Buttler Led England Team ) नेतृत्वाखालील इंग्लंड संघ न्यूझीलंड विरुद्ध सामना चालू ( Brisbane Cricket Ground Live Update ) आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ( England Won Toss and Decided to Bat First ) निर्णय घेतला. इंग्लडने न्यूझिलंडला 180 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझिलंडने या घडीला 12 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 87 धावा केल्या होत्या.
दोन्ही संघ खेळत आहेत, इंग्लंड : जोस बटलर (डब्ल्यू/सी), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.
न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (क), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
गुणतालिकेत न्यूझीलंड प्रथम स्थानावर : न्यूझीलंडने 3 सामने खेळले असून, त्यात दोन सामने जिंकले आहेत. पाच गुणांसह किवी संघ गट एकमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचे तीन सामन्यांतून तीन गुण आहेत आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत होणार आहे.
इंग्लंड संघासाठी हा सामना करा अथवा मरा या स्थितीचा : किवी संघाला विजयाची नोंद करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित करायचे असले तरी इंग्लंडसाठी हा सामना करा किंवा मरा असा आहे. दोन्ही संघांकडे चांगले गोलंदाज आहेत. इंग्लंडकडे मार्क वुड, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स, आदिल रशीद, मोईन अली आणि डेव्हिड विली यांसारख्या खेळाडूंची मोठी यादी आहे. न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी आणि मिचेल सँटनर हे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत.
खेळपट्टीचा अहवाल : गब्बा की खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. येथील विकेट हा उच्च स्कोअरिंग आहे. पण, वेगवान गोलंदाजांना बी खेळपट्टीची बरीच मदत मिळण्याची शक्यता आहे. येथे गोलंदाजांना पुरेसा बाउंस मिळेल. त्यामुळे फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.