हैदराबाद - आजपासून (17 ऑक्टोबर) यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून यापैकी अनेक खेळाडू युएईमध्येच आहेत. तर बाकी खेळाडू एक एक करुन पोहोचत आहेत. आयसीसीने सहभागी सर्व संघांना चार गटांमध्ये विभागले असून संपूर्ण स्पर्धेदरम्यान 45 सामने खेळले जाणार आहेत.
-
Who will lift the ICC Men's #T20WorldCup in 2021? pic.twitter.com/NoayU1S3Y3
— ICC (@ICC) October 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Who will lift the ICC Men's #T20WorldCup in 2021? pic.twitter.com/NoayU1S3Y3
— ICC (@ICC) October 16, 2021Who will lift the ICC Men's #T20WorldCup in 2021? pic.twitter.com/NoayU1S3Y3
— ICC (@ICC) October 16, 2021
भारत आणि पाकिस्तान या दोघांना विश्वचषकातील गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या वर्षीही ही स्पर्धा भारतातच होणार होती. पण कोरोनामुळे ती यूएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात आली.
आयसीसी टी -20 विश्वचषक संघात भारतीय खेळाडू
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
स्पर्धेत भारताचे सामने कधी होतील?
24 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड
3 नोव्हेंबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर - भारत वि क्वालिफायर्स (पात्रता फेरीत गट ब चा विजेता)
8 नोव्हेंबर - भारत वि क्वालिफायर्स (गट अ मधील उपविजेता संघ पात्रता फेरी)
हेही वाचा - राहुल द्रविड टीम इंडियाला हेड कोच, गांगुली-शहा बैठकीनंतर दिला होकार