ETV Bharat / sports

शाहिद आफ्रिदीचे लंकेत वेगवान अर्धशतक, पण...

आफ्रिदीच्या टी-२० कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तीन वर्षांपूर्वी, त्याने २० चेंडूतच हा कारनामा केला होता. २०१७मध्ये, त्याने हॅम्पशायरकडून टी-२० ब्लास्टमध्ये खेळताना डर्बीशायर विरुद्ध अर्धशतक केले.

shahid afridi hits his fastest t20 fifty in lpl
शाहिद आफ्रिदीचे लंकेत वेगवान अर्धशतक, पण...
author img

By

Published : Nov 29, 2020, 10:12 AM IST

कोलंबो - लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) पहिल्या सत्रात गॉल ग्लेडिएटर्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने जाफना स्टॅलियन्सविरुद्ध २० चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत २३ चेंडूंत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. आफ्रिदीच्या या खेळीनंतरही ग्लेडिएटर्सला विजय नोंदवता आला नाही.

shahid afridi hits his fastest t20 fifty in lpl
शाहिद आफ्रिदीचे लंकेत वेगवान अर्धशतक

आफ्रिदीच्या टी-२० कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तीन वर्षांपूर्वी, त्याने २० चेंडूतच हा कारनामा केला होता. २०१७मध्ये, त्याने हॅम्पशायरकडून टी-२० ब्लास्टमध्ये खेळताना डर्बीशायर विरुद्ध अर्धशतक केले. त्यानंतर त्याने या अर्धशतकाचे शतकात रूपांतर केले आणि त्याच्या टी-२० कारकीर्दीतील हे एकमेव शतक आहे.

हेही वाचा - दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला कोरोनाची लागण

जाफना स्टॅलियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात आफ्रिदी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला उतरला. तोपर्यंत १४व्या षटकात संघाची धावसंख्या ४ बाद ९२ अशी होती. आफ्रिदीच्या स्फोटक खेळीमुळे संघाची धावसंख्या ८ बाद १७५ धावांवर पोहोचली. मात्र, संघासाठी ही धावसंख्या पुरेशी ठरली नाही. जाफनाकडून श्रीलंकेचा फलंदाज अविष्का फर्नांडोने ६३ चेंडूत नाबाद ९२ धावा करत सामना जिंकवून दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.