ETV Bharat / sports

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : इंग्लंडची बांगलादेशवर मात, पीटरसन चमकला - शहीद वीर नारायण सिंह अंतर्राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने ६ षटके राखून ३ गड्यांच्या मोबदल्यात हा सामना जिंकला.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज
author img

By

Published : Mar 8, 2021, 6:45 AM IST

रायपूर - शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या सामन्यात इंग्लंड लेजेंड्स संघाने बांगलादेश लेजेंड्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला. इंग्लंडकडून कर्णधार केव्हिन पीटरसनने ४२ धावांची शानदार खेळी साकारली.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने ६ षटके राखून ३ गड्यांच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. इंग्लंडकडून पीटरसनने १७ चेंडूत ७ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ४२ धावा केल्या. तर डॅरेन मॅडी ३२ आणि गॅव्हिन हॅमिल्टन ५ धावांवर नाबाद राहिले.

तत्पूर्वी बांगलादेशची सुरुवात खूप खराब झाली. त्यांनी ४५ धावांत ४ गडी गमावले होते. बांगलादेशकडून खालेद मसूदने सर्वाधिक ३१ धावा केल्या. इंग्लंडकडून ट्रेमलेटने २, पानेसार, साईडबॉटॉम आणि स्कोफिल्डने प्रत्येकी एक गडी बाद केला.

हेही वाचा - 'हा' स्टार गोलंदाज बनणार शाहिद आफ्रिदीचा जावई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.