ETV Bharat / sports

विराटच्या लेकीवर अत्याचार करण्याची धमकी देणारा अटकेत; मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Vamika

20 विश्वचषकात टीम इंडियाचा पराभूत झाल्यानंतर टीकाकारांनी टीकेची खालची पातळी गाठत विराटच्या नऊ महिन्याच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या.

विराटच्या लेकीवर अत्याचार करण्याची धमकी देणारा अटकेत; मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
police arrested the person who Rape Threat to Virat Kohli's 10-Month-Old Daughter
author img

By

Published : Nov 12, 2021, 10:52 AM IST

मुंबई - T20 विश्वचषकात टीम इंडियाला सलग दोन सामन्यात पराभूत व्हावं लागलं. यामुळे सोशल मीडियावर टीम इंडियावर जोरदार टीका झाली. टीकाकारांच्या हिटलिस्टवर सर्वप्रथम आहे कर्णधार विराट कोहली होता. परंतु या टीकाकारांनी टीकेची खालची पातळी गाठत विराटच्या नऊ महिन्याच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी विराट आणि अनुष्काच्या व्यवस्थापकाने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.

विराटच्या लेकीवर अत्याचार करण्याची धमकी देणारा अटकेत; मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विराट आणि अनुष्काच्या 10 महिन्यांच्या मुलीबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने संगारेड्डी, हैदराबाद येथून एका आरोपीला अटक केली आहे. रामनागेश अकू बाथिनी असे आरोपीचे नाव असून तो आयआयटीचा विद्यार्थी आहे. विराट आणि अनुष्काच्या वतीने त्याच्या व्यवस्थापकाने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. आरोपींविरुद्ध कलम 67 आणि 67 ब सह 354 ए 506 आणि 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींच्या अटकेसाठी सायबर सेलने दिल्ली पोलिसांचीही मदत घेतली होती. संगारेड्डी येथून आरोपीला अटक केल्यानंतर त्याला मुंबई बीकेसी सायबर सेलच्या मुख्यालयात आणण्यात आले व वैद्यकीय नंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने चौकशीत सांगितले की, ज्या दिवशी भारत पाकिस्तानचा सामना होता आणि त्या सामन्यात भारत हरला. तेव्हा भारत पाकच्या दोन्ही बाजूचे लोक गुप्पीस्तान रेडिओ नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ट्विटरवर आपला राग काढत आहेत आणि ट्विटद्वारे त्यांची चर्चा सुरू आहे.

अकु बथिनी राम नागेशने अटकेनंतर सायबर सेलसमोर आपली चूक मान्य केली आणि आपण चुकून हे ट्विट केल्याची कबुली दिली. ज्याचा त्याला आता पश्चाताप होत आहे. ट्विट केल्यानंतर आरोपी रात्री झोपला आणि सकाळी उठल्यावर त्याला कळाले की त्याचे ट्विट व्हायरल झाले आहे. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, महिला आयोगातील अनेक महिला संघटनांनीही आक्षेप घेत कठोर कारवाईची मागणी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.