लाहोर - दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा खेळाडू फॉफ डू प्लेसिस १४नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) पदार्पण करणार आहे. प्लेऑफ टप्प्यात प्लेसिस पेशावर झल्मीकडून खेळणार आहे. आयसीसी वर्ल्ड इलेव्हनचा कर्णधार म्हणून डु प्लेसिसने २०१७मध्ये पाकिस्तानला शेवटची भेट दिली होती. आता तो पेशावर झल्मी येथे कायरन पोलार्डची जागा घेईल. पोलार्ड आपल्या वेस्ट इंडिज संघासह न्यूझीलंड दौर्यावर असेल.
कोरोनामुळे पीएसएल स्थगित -
पीएसएल स्पर्धा फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळली जाते. ही स्पर्धा यावर्षी देखील आयोजित करण्यात आली होती. परंतू कोरोना विषाणूमुळे स्पर्धेतील प्लेऑफचा टप्पा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला. आता प्लेऑफचे सामने १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
-
🇿🇦 Power Hitter Faf Du Plessis Joins the #YellowStorm
— PeshawarZalmi (@PeshawarZalmi) November 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Welcome⚡@faf1307#Zalmi #TayyarHain pic.twitter.com/pja8Gh42cz
">🇿🇦 Power Hitter Faf Du Plessis Joins the #YellowStorm
— PeshawarZalmi (@PeshawarZalmi) November 2, 2020
Welcome⚡@faf1307#Zalmi #TayyarHain pic.twitter.com/pja8Gh42cz🇿🇦 Power Hitter Faf Du Plessis Joins the #YellowStorm
— PeshawarZalmi (@PeshawarZalmi) November 2, 2020
Welcome⚡@faf1307#Zalmi #TayyarHain pic.twitter.com/pja8Gh42cz
डु प्लेसिस म्हणाला, "पीएसएल २०२०च्या प्लेऑफ स्टेज सामन्यासाठी मी पेशावर झल्मीबरोबर खेळण्यास खूप उत्सुक आहे. २०१७मध्ये मी आयसीसी वर्ल्ड इलेव्हनमध्ये गेलो होतो, तेव्हा मी पाकिस्तानमध्ये खेळलो होतो. हा एक वेगळा अनुभव आहे. तथापि कोरोनामुळे तो एक अविस्मरणीय क्षण म्हणून पाहिला जाईल."
इंग्लंडचे सहा क्रिकेटपटू पीएसएलमध्ये खेळणार -
डु प्लेसिस व्यतिरिक्त अन्य २० विदेशी खेळाडूंनीही या लीगमध्ये खेळण्याची माहिती दिली आहे. त्याच्याशिवाय इंग्लंडचे सहा क्रिकेटपटू पीएसएल प्लेऑफमध्येही खेळताना दिसतील. लीगमध्ये १४ नोव्हेंबरला पहिला क्वालिफायर सामना आणि एलिमिनेटर सामना खेळला जाईल. दुसरा एलिमिनेटर सामना १५ नोव्हेंबरला तर अंतिम सामना १७ नोव्हेंबरला होईल.