मेलबर्न - बिग बॅश लीगच्या दहाव्या हंगामासाठी वेगवान गोलंदाज दिलबर हुसेनने मेलबर्न स्टार्स संघाशी करार केला आहे. पाकिस्तानच्या फैसलाबादमध्ये जन्मलेल्या हुसेन संपूर्ण हंगामात मेलबर्न संघासमवेत असेल.
हेही वाचा - किंग खानने विकत घेतला नवीन क्रिकेट संघ
लाहोर कलंदर्स आणि मेलबर्न संघातील संबंधामुळे हुसेनचे बीबीएलमध्ये पुनरागमन झाले आहे. शेवटच्या मोसमात हुसेनने स्टार्सकडून बीबीएलमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात त्याने दिग्गज फलंदाज अब्राहम डिव्हिलियर्सला बाद केले होते. संघाच्या गोलंदाजीत विविधता आणण्यासाठी हुसेनचे आगमन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास स्टार्सचा प्रशिक्षक डेव्हिड हसीने व्यक्त केला आहे.
होल्डर बीबीएलमध्ये तीन सामने खेळणार -
बीबीएलच्या दहाव्या हंगामासाठी सिडनी सिक्सर्सने वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाचा कर्णधार जेसन होल्डरशी करार केला आहे. होल्डर मात्र तीन सामन्यासाठी सिक्सर्स संघात असेस. होल्डर सध्या न्यूझीलंडमध्ये असून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. तो या महिन्यात होबार्टमध्ये सिक्सर्समध्ये सामील होईल.