ETV Bharat / sports

Cricketer Suryakumar Yadav : विराट कोहली सोबतच्या बाचाबाचीवर सूर्यकुमार यादवचा नवा खुलासा, म्हणाला...

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघाच्या सामन्या दरम्यान सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्यात बाचाबाची झाली होती. ज्यावर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) एका कार्यक्रमात खुलासा केला आहे.

author img

By

Published : Apr 19, 2022, 8:00 PM IST

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा थरार 26 मार्चपासून सुरु झाला आहे. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स वगळता आता प्रत्येक संघाने सहा सामने खेळले आहेत. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) देखील आपले सहा सामने खेळलेत. पंरतु या संघाला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. मात्र या संघाचा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) सध्या शानदार फॉर्मध्ये आहे. त्याने आता एका शोमध्ये बोलताना, त्याने विराट आणि त्याच्यातील एका वादावर खुलासा केला आहे.

आयपीएल 2020 मध्ये मुंबई विरुद्ध बंगळुरु ( IPL 2020 Mumbai vs Bangalore ) संघात एक सामना झाला होता. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने शानदार पारी खेळताना, मुंबई संघाला विजय मिळवून दिला. या सामन्या दरम्यान विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यात एक चकमक झाली होती, ज्यावर आता सूर्यकुमार यादवने गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या लोकप्रिय यूट्यूब शोमध्ये बोलताना त्या घटनेचा खुलासा केला आहे.

विराट कोहलीने उकसवल्यानंतर ही सूर्यकुमार यादव शांत राहिला होता, त्यावर बोलताना तो म्हणाला, मैदानावरील त्याची उर्जा नेहमीच वेगळ्या पातळीवर असते. दोन्ही संघांना विजयासाठी हा सामना महत्त्वाचा होता. त्यामुळे त्याचे स्लेजिंगही दुसऱ्या पातळीवर होते. मी स्वतःला सांगत होतो, 'मला माझा फोकस ठेवायचा आहे आणि हा सामना जिंकायचा आहे, काहीही झाले तरी. मी च्युइंगम चघळत होतो पण आतून घाबरलो होतो.

यादवने पुढे स्पष्ट केले की मुंबई जिंकण्यावर लक्ष केंद्रित केल्याने त्याला शांत राहण्यास कशी मदत झाली. तो म्हणाला, ''तो माझ्याकडे आला आणि मी स्वतःला म्हणालो, 'भाऊ, मी तुझ्या पाया पडत आहे. काही बोलू नकोस! हे पण निघून जाईल.' माझी बॅट खाली पडली आणि रागाने बघण्याचा क्षण संपला. मग मी संपूर्ण मॅच त्याच्याकडे बघितले नाही आणि माझे डोके खाली केले आणि फलंदाजी सुरू ठेवली.''

भारतीय संघात निवड होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खूप धावा केल्या होत्या, पण त्याला संधी मिळत नव्हती. तथापि, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) यादवला सातत्य राखण्यास सांगितले. कारण त्याला विश्वास होता की, एक दिवस तो नक्कीच भारतीय संघात निवडला जाईल. रोहित शर्माकडून मिळालेल्या पाठींब्याबद्दल बोलताना यादव म्हणाला, आयपीएल 2020 च्या हंगामात माझा वाढदिवस होता आणि रोहित भाईने शुभेच्छा देताना म्हटले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा. धावा करत राहा, तुला ती भारतीय कॅप मिळेल. भारतीय संघाचे दरवाजे तोडण्यासाठी प्रत्येक सामन्यात धावा काढण्यासाठी त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला.

हेही वाचा - Former Cricketer Ryan Campbell : नेदरलँडच्या क्रिकेट प्रशिक्षकाला हृदयविकाराचा झटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.