मुझफ्फरपूर: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Master Blaster Sachin Tendulkar ) आणि त्याची पत्नी डॉ. अंजली ( Sachin Tendulkar wife Dr. Anjali ) यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, मुझफ्फरपूरची प्रसिद्ध शाही लिची भेट दिली जाणार आहे. सचिनचा 'सुपर फॅन' आणि मुझफ्फरपूरचा रहिवासी सुधीर कुमार चौधरी उर्फ गौतम ( Super fan Sudhir Kumar Chaudhary )22 मे रोजी प्रसिद्ध शाही लिची भेट म्हणून घेऊन जाणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांमध्ये शरीराला एका विशिष्ट रंगात रंगवून तिरंगा फडकवणारा, शंख वाजवणारा सुधीर या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनाही त्यांच्या शहरात लिची चाखवण्यासाठी भेट देणार आहे. सचिन आणि अंजलीचा विवाह 24 मे रोजी आहे. आयएएनएसशी बोलताना सुधीर म्हणाला, मी येथून 1000 लिची घेऊन मुंबईला जाईन आणि सचिन सरांच्या लग्नाच्या दिवशी शाही लिचीने त्यांचे तोंड गोड करीन.
त्यांनी शाही लिची निवडल्याचे सांगितले. लिची खराब होऊ नये म्हणून तो खास पॅकिंगनंतर मुंबईला नेणार आहे. त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे गेली दोन वर्षे ते लिची घेऊन मुंबईला गेलेले नाहीत. सचिन आणि त्याच्या पत्नीला लिची खूप आवडते असे त्यांनी सांगितले. सुधीर सांगतो की, यावर्षी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांना देखील लिची चाखवण्यासाठी त्यांच्या शहरात जाणार आहेत. याआधीही सुधीरने अनेक क्रिकेटपटूंना मुझफ्फरपूरची शाही लिची खाऊ घातली आहे.
विशेष म्हणजे मुझफ्फरपूरची शाही लीची लज्जतदार आणि गोड आहे, जी देश-विदेशातही प्रसिद्ध आहे. यावर्षी, बिहार सरकारने राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांना शाही लिची पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - Ipl 2022 Kkr Vs Lsg : कोलकात्याच्या नाईट रायडर्स समोर आज लखनौच्या सुपरजायंट्सचे आव्हान