मुंबई - श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज नुवान जोएसा याच्यावर सहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीच्या अँटी करप्शन ट्रिब्यूनलन आयसीसी अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केल्याप्रकरणी नुवानवर ही कारवाई केली आहे. नुवानची ही बंदी ३१ ऑक्टोबर २०१८ पासून लागू होणार आहे.
नुवान जोएसा यानं भ्रष्टाचार केल्याची माहिती आयसीसीकडून लपवलीच नाही, तर अन्य खेळाडूंनाही भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहित केले. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा प्रयत्नाचा आरोप लावला आहे.
नुवान जोएसा हा आयपीएलच्या पहिल्या पर्वात २००८मध्ये हैदराबाद डेक्कन चार्जर्सकडून तीन सामने खेळला होता. त्यानंतर या संघाचे नाव बदलून सनरायजर्स हैदराबाद ठेवण्यात आले.
नुवानने श्रीलंकेकडून ३० कसोटी व ९५ एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने अनुक्रमे ६४ व १०८ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या तीन चेंडूवर हॅटट्रिक घेण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने १९९९ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध हरारे कसोटीत हा विक्रम नोंदवला होता.
हेही वाचा - IPL २०२१ Points Table : बंगळुरूने चेन्नईला दिला मोठा धक्का, पटकावले मानाचे स्थान
हेही वाचा - IPL २०२१ : मुंबई नाही तर 'हा' संघ जिंकणार स्पर्धा, रवी शास्त्रींचा सूचक इशारा