मुंबई: पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) चॅम्पियन मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या उर्वरित सामन्यांसाठी दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद अर्शद खानच्या जागी फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय सिंगचा समावेश केला ( Kumar Kartikeya Singh replaces Arshad Khan ) आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुमार कार्तिकेयने 2018 मध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत नऊ प्रथम श्रेणी सामने, 19 लिस्ट ए सामने आणि आठ टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे 35, 18 आणि नऊ विकेट्स घेतल्या आहेत.
तो सपोर्ट टीमचा भाग म्हणून आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत होता आणि आता त्याला मुख्य संघात सामील होण्यासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. कारण दुखापतीमुळे अर्शद खान उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
-
From being a support player to now being drafted into the first team! 🙌
— Mumbai Indians (@mipaltan) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Welcome to #OneFamily, Kartikeya 💙#DilKholKe #MumbaiIndians @Kartike54075753 https://t.co/KYSVibKHfl
">From being a support player to now being drafted into the first team! 🙌
— Mumbai Indians (@mipaltan) April 28, 2022
Welcome to #OneFamily, Kartikeya 💙#DilKholKe #MumbaiIndians @Kartike54075753 https://t.co/KYSVibKHflFrom being a support player to now being drafted into the first team! 🙌
— Mumbai Indians (@mipaltan) April 28, 2022
Welcome to #OneFamily, Kartikeya 💙#DilKholKe #MumbaiIndians @Kartike54075753 https://t.co/KYSVibKHfl
फ्रँचायझीच्या निवेदनानुसार, कुमार कार्तिकेय सिंग ( Kumar Kartikeya Singh ) हा मुंबई नेट्समध्ये एक प्रभावी गोलंदाज असल्याचे दिसत होते आणि त्याच्या गोलंदाजी कौशल्यात सुधारणा आणि उत्कृष्ट-ट्युनिंगच्या गतीने त्याला मुख्य संघात स्थान दिले. डावखुरा फिरकीपटू आता 20 लाख रुपयात मुंबईच्या मुख्य संघात सामील होणार आहे.
-
Wishing our all-rounder Mohd. Arshad Khan a speedy recovery.💪
— Mumbai Indians (@mipaltan) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Come back stronger, Arshad bhai 🙌💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/u8zdpZG3Pz
">Wishing our all-rounder Mohd. Arshad Khan a speedy recovery.💪
— Mumbai Indians (@mipaltan) April 28, 2022
Come back stronger, Arshad bhai 🙌💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/u8zdpZG3PzWishing our all-rounder Mohd. Arshad Khan a speedy recovery.💪
— Mumbai Indians (@mipaltan) April 28, 2022
Come back stronger, Arshad bhai 🙌💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/u8zdpZG3Pz
आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून मुंबई जवळपास बाहेर पडली आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की त्यांनी आठपैकी आठ सामने गमावले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा पुढील सामना 30 एप्रिल रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.