ETV Bharat / sports

SL vs IND १st ODI : भारतीय संघाची विजय सलामी, पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव - India

पहिल्या एकदिवसीय सामन्यात नव्या दमाच्या भारतीय संघाने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला.

SL vs IND 1st ODI Highlights: India Beat Sri Lanka By 7 Wickets To Go 1-0 Up In 3-Match Series
SL vs IND १st ODI : टीम इंडियाची विजय सलामी, पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव
author img

By

Published : Jul 18, 2021, 11:19 PM IST

Updated : Jul 18, 2021, 11:46 PM IST

कोलंबो - पहिल्या एकदिवसीय सामन्यात नव्या दमाच्या भारतीय संघाने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २६२ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान ३६.४ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. कर्णधार शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी करत विजयात मोठा वाटा उचलला. तर इशान किशन ५९ तर पृथ्वी शॉ याने ४३ धावांचे योगदान दिले. भारताने या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

कुलदीपने श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाला मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो या जोडीने ४९ धावांची सलामी दिली. फिरकीपटू युझवेंद्र चहलने आपल्या पहिल्याच षटकात मैदानावर स्थिरावलेल्या अविष्का फर्नांडोला (३२) मनीष पांडेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कुलदीप यादवने पदार्पणवीर भानुका राजपक्षाला तसेच मिनोद भानुकाला बाद करत लंकेला बॅकफूटवर ढकलले.

चमिका करुणारत्नेची फटकेबाजी

कर्णधार दासुन शनाका आणि चरिथा असालांकाने लंकेचा डाव सावरला. अखेरच्या षटकात चमिका करुणारत्नेने फटकेबाजी करत संघाला २६२ अशी धावसंख्या गाठून दिली. करुणारत्नेने २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ४३ धावा केल्या. भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

पृथ्वी शॉची वादळी खेळी

श्रीलंकेच्या २६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या जोडीने भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या पाच षटकात भारताने बिनबाद ५७ धावा धावफलकावर लावल्या. यातील नाबाद ४३ धावा तर एकट्या पृथ्वीने चोपल्या. पृथ्वीच्या खेळीची धनंजय डि सिल्वाने संपवली. पृथ्वीने २४ चेंडूत ९ चौकारांसह ४३ धावांची खेळी केली. त्यानंतर पदार्पणवीर इशान किशनने शिखर धवनसह मैदानात जम बसवला.

कर्णधार शिखर धवन ८६ धावांवर नाबाद

किशनने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत ३३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. तो ५९ धावांवर बाद झाला. शिखर धवनने दुसरी बाजू लावून धरत आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. ३१व्या षटकात धनंजय डि सिल्वाने मनीष पांडेला (२६) बाद केले. त्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादवसोबत धवनने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुर्यकुमारने नाबाद ३१ धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूने धवन ८६ धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा - अर्जुन पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन खेळाडूवर का आली शेती करण्याची वेळ?

हेही वाचा - जातीधर्माच्या भिंती मोडून...भारतीय खेळाडू शिवम दुबेने मुस्लिम मैत्रीण अंजुम खानशी केलं लग्न

Last Updated : Jul 18, 2021, 11:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.