ETV Bharat / sports

WTC Final : न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी केली तर टीम इंडियाची काय होणार अवस्था, बाँडचे भाकित - शेन बाँड

न्यूझीलंडने जर नाणेफेक जिंकली तर ते प्रथम गोलंदाजी स्विकारतील. अंतिम सामन्यात नाणेफेक हे महत्वाचा फॅक्टर ठरेल. केन विल्यमसनने जर नाणेफेक जिंकत गोलंदाजी केली. तर ते भारतीय संघाला स्वस्तात बाद करतील, असे शेन बाँडने सांगितले.

shane-bond-told-that-if-new-zealand-won-toss-and-bowl-first-they-will-bowl-out-team-india-cheaply-in-wtc-final
WTC Final : न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी केली तर टीम इंडियाची काय होणार अवस्था, बाँडचे भाकित
author img

By

Published : Jun 16, 2021, 4:40 PM IST

मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत अनेक भाकित वर्तवले जात आहे. १८ जूनपासून सुरू होणाऱ्या या सामन्याबाबत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बाँड याने त्याचे मत मांडलं आहे.

शेन बाँड एका संकेतस्थळाशी बोलताना म्हणाला, 'न्यूझीलंडचा संघच अंतिम सामना जिंकेल, असे मला वाटतं. त्यांनी अंतिम सामन्याआधी दोन कसोटी सामने खेळली. त्याचा नक्कीच प्रभाव पडेल. पण भारतीय गोलंदाजी आक्रमण देखील संतुलित आहे. भारतीय संघ अंतिम सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरेल.'

न्यूझीलंडने जर नाणेफेक जिंकली तर ते प्रथम गोलंदाजी स्विकारतील. अंतिम सामन्यात नाणेफेक हे महत्वाचा फॅक्टर ठरेल. केन विल्यमसनने जर नाणेफेक जिंकत गोलंदाजी केली. तर ते भारतीय संघाला स्वस्तात बाद करतील, असे देखील बाँडने सांगितले.

दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंड संघाने इंग्लंडविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली. यात त्यांनी १-० असा विजय मिळवला. या मालिकेचा फायदा त्यांना होईल, असा अंदाज अनेक आजी-माजी खेळाडूंनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे भारतीय संघाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यांनी आपल्याच खेळाडूंचे दोन संघ करत एक सराव सामना खेळला. अशा परिस्थितीत भारतीय संघ अंतिम सामन्यात कशी कामगिरी करणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • न्यूझीलंडचा संघ -
  • केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग
  • भारताचा संघ -
  • रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज

हेही वाचा - युजवेंद्र चहल घेतोय पत्नी धनश्रींकडून डान्सचे धडे, खास व्हिडीओ शेअर

हेही वाचा - WTC Final : महामुकाबल्याआधीच केन विल्यमसनला जबर धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.