ETV Bharat / sports

Pakistan Super League : शाहीन आफ्रिदीने पीएसएल ट्रॉफी जिंकत केला 'हा' खास कारनामा

लाहोर कलंदर्सला प्रथमच चॅम्पियन ( First Time Lahore Calendars Champion ) बनवणारा शाहीन आफ्रिदी टी-२० लीग जिंकणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. त्याने भारताच्या रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला आहे.

Shahin Afridi
Shahin Afridi
author img

By

Published : Feb 28, 2022, 6:27 PM IST

कराची : रविवारी पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना ( Pakistan Super League final ) पार पडला आहे. हा अंतिम सामना लाहोर कलंदर्स आणि मुल्तान सुल्तान्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लाहोर कलंदर्सने मुल्तान सुल्तान्सचा 42 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पीएसएलच्या ट्रॉफीवर शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली नाव ( Lahore Calendars won the PSL title ) कोरले. तसेच ही ट्रॉफी जिंकत शाहीन आफ्रिदीने आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे.

शाहीन आफ्रिदीने वयाच्या 21 वर्षी लाहोर कलंदर्स संघाचे नेतृत्व ( Lahore Calendars captain Shahin Afridi ) करताना जेतेपद पटकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. त्याच्या अगोदर हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथच्या ( Former Australia captain Steve Smith ) नावावर होता. त्याने 2012 मध्य वयाच्या 22 व्या वर्षी सिडनी सिक्सर्स संघाला आपल्या नेतृत्वाखाली जेतेपद मिळवून दिले होत. त्याने हा कारनामा बिग बॅश लीगमध्ये ( Big Bash League ) केला होता.

कोणत्याही स्तरावर नेतृत्व न करणाऱ्या शाहीन आफ्रिदीला पीएसएल स्पर्धेत लाहोर कलंदर्स संघाने सर्वांना चकित केले होते. मात्र रविवारी पार पडलेल्या सामन्यानंतर लाहोर संघ प्रबंधनाचा निर्णय योग्य आणि सार्थ ठरवला आहे. अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्सने 42 धावांनी आरामात विजय ( Lahore Calendars won by 42 runs ) नोंदवला. 25 धावांत तीन विकेट्स गमावूनही संघाने अनुभवी मोहम्मद हाफीज (69), हॅरी ब्रुक (नाबाद 41) आणि डेव्हिड विझ (नाबाद 28) यांच्या खेळीने दमदार पुनरागमन केले आणि पाच विकेट्सवर 180 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ब्रुक आणि विसी यांनी अवघ्या 2.4 षटकांत 43 धावांची नाबाद भागीदारी केली.

प्रत्युत्तरात आफ्रिदी (30 धावांत 3 बळी), मोहम्मद हफीझ (23 धावांत 2 बळी) आणि जमान खान (26 धावांत 2 बळी) यांच्या सुरेख गोलंदाजीसमोर मुलतानचा संघ 19.3 षटकांत 138 धावांत गारद झाला. मुलतान सुलतानकडून खुशदिल शाहने 32 धावा केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.