मुंबई: अभिनेता शाहरुख खान आता महिला क्रिकेट संघाचा मालक झाला ( Shah Rukh Khan bought women team ) आहे. शाहरुख खानने महिला टी-20 लीग म्हणजेच महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये एक संघ विकत घेतला आहे. याबाबतची माहिती स्वत: अभिनेता शाहरुख खानने दिली आहे. शाहरुख खानने ट्विट करत ही सर्व माहिती दिली.
-
Shah Rukh Khan now owner of women's cricket team!
— ANI Digital (@ani_digital) June 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/wNmV3uVHwM
#ShahRukhKhan #Cricket pic.twitter.com/6EylvRiAp8
">Shah Rukh Khan now owner of women's cricket team!
— ANI Digital (@ani_digital) June 18, 2022
Read @ANI Story | https://t.co/wNmV3uVHwM
#ShahRukhKhan #Cricket pic.twitter.com/6EylvRiAp8Shah Rukh Khan now owner of women's cricket team!
— ANI Digital (@ani_digital) June 18, 2022
Read @ANI Story | https://t.co/wNmV3uVHwM
#ShahRukhKhan #Cricket pic.twitter.com/6EylvRiAp8
शाहरुख खान ट्विट करताना म्हणाला की, त्याचा नाइट रायडर्स क्रिकेट संमूहाने ( Knight Riders Cricket Group ) आता महिला क्रिकेट फ्रँचायझीमधील पहिला महिला संघ खरेदी केला आहे. महिला संघाला 'ट्रिनबागो नाइट रायडर्स' ( Trinbago Knight Riders ) असे नाव देण्यात आले, असून हा संघ महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे.
त्याने लिहिले, "आमच्या सर्वांसाठी @KKRiders @ADKRiders आणि अर्थातच @TKRiders मधील सुंदर लोकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. आशा आहे की, मी ते लाइव्ह पाहण्यासाठी तिथे उपस्थित राहू शकेन!".
-
This is such a happy moment for all of us at @KKRiders @ADKRiders & of course the lovely set of people at @TKRiders Hope I can make it there to see this live!! https://t.co/IC9Gr96h92
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This is such a happy moment for all of us at @KKRiders @ADKRiders & of course the lovely set of people at @TKRiders Hope I can make it there to see this live!! https://t.co/IC9Gr96h92
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 17, 2022This is such a happy moment for all of us at @KKRiders @ADKRiders & of course the lovely set of people at @TKRiders Hope I can make it there to see this live!! https://t.co/IC9Gr96h92
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 17, 2022
महिला कॅरिबियन प्रीमियर लीग ( Women Caribbean Premier League ) 30 ऑगस्टपासून सुरू होईल आणि शाहरुखच्या संघाव्यतिरिक्त, बार्बाडोस रॉयल्स आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्स या मालिका खेळण्यासाठी पुष्टी केलेले इतर दोन संघ आहेत.
शाहरुख अभिनेत्री जुही चावलासह नाइट रायडर्स ग्रुपचा सह-मालक ( Co-owner of Knight Riders Group ) आहे. त्रिनबागो नाइट रायडर्स व्यतिरिक्त, तो कोलकाता नाइट रायडर्स, लॉस एंजेलिस नाइट रायडर्स आणि अबू धाबी नाइट रायडर्स या तीन क्रिकेट संघांचा सह-मालक आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात शाहरुखला मुकावे लागले. त्यामुळे जुहीची मुलगी जान्हवी मेहता आणि त्याची मुले आर्यन आणि सुहाना खान यांनी या कार्यक्रमात कलाकारांचे प्रतिनिधित्व केले.
क्रिकेटशिवाय शाहरुख जवळपास अडीच वर्षानंतर पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्याकडे तीन चित्रपट आहेत - सिद्धार्थ आनंदचा 'पठाण' ज्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम सह कलाकार आहेत. नयनतारासोबत अॅटलीचा 'जवान' आणि तापसी पन्नूसोबत राजकुमार हिरानीचा 'डंकी'.