मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जूनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय महिला संघांची घोषणा झाली आहे. शुक्रवारी बीसीसीआयने केलेल्या संघाच्या घोषणेमध्ये शफाली वर्माचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
चार दिवसांच्या कसोटी सामन्यात शिखा पांडे आणि तानिया भाटिया या खेळाडूंचीही पुन्हा निवड झाली असली तरीदेखील शफालीच्या निवडीवरुन हे दिसून येते की निवडकर्त्यांचा असा विश्वास वाटतो की ती गेम चेंजर असू शकते.
१६ जूनपासून सुरू होणार्या चार दिवसीय कसोटी सामन्यात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच मैदानात उतरतील. त्यानंतर २७ जूनपासून सुरू होणार्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघ ब्रिस्टल, टॉन्टन आणि वॉरेस्टर येथे खेळणार आहेत.
त्यानंतर ९ जुलैपासून दोन्ही संघ टी -२० मध्ये प्रवेश करतील आणि तीन सामने नॉर्थॅम्प्टन, होव आणि चेल्म्सफोर्ड येथे होतील. "
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा सिनीयर महिला संघ:
मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पुनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमीमह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक) ), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव.
टी २० साठी भारताचा सिनीयर महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमीमह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, ऋचा घोष, हर्लीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), इंद्राणी रॉय (यष्टीरक्षक), शिखा पांडे, पूजा वस्त्रकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव, सिमरन दिल बहादूर.
हेही वाचा - सोनू सूदचे लोकांच्या मदतीसाठी 'पुढचे पाऊल'!!