मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 58 वा सामना बुधवारी (11 मे) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानला दिल्ली कॅपिटल्सकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरला युझवेंद्र चहलने बोल्ड केले, पण बेल्स न पडल्याने वॉर्नरला नॉटआऊट देण्यात आले. या विषयावर भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने ( Former Indian cricketer Sanjay Manjrekar ) आपले मत व्यक्त केले आहे.
आधुनिक क्रिकेटमध्ये बेल्सपासून फारकत घेतली पाहिजे -
इएसपीएन क्रिकइंफोच्या ( ESPN cricinfo ) T20 टाइम आऊट शोमध्ये बोलताना मांजरेकर म्हणाले, 'मी यापूर्वीही असेच सांगितले आहे. एलईडी स्टंपवर बेल्स ठेवण्याची गरज नाही. चहलने अप्रतिम गोलंदाजी केली आणि तो ती विकेट घेण्यास हक्कदार होता. वॉर्नरने खराब शॉट खेळला, पण त्याला संजीवनी मिळाली. जोपर्यंत बेल्सचा योग्य वापर होत नाही, तोपर्यंत त्यांना दूर ठेवावे. कारण एलईडी तंत्रज्ञान असताना त्याची गरज नाही.
बुधवारी राजस्थान आणि दिल्ली यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात चहलने डावाच्या 9व्या षटकात वॉर्नरला बोल्ड ( Chahal bowled Warner ) केले. चेंडूने लेग-स्टंपला स्पर्श केला, पण बेल्स पडल्या नाहीत. वॉर्नर नशीबवान ठरला. कारण त्यानंतर त्याने नाबाद 52 धावा करून दिल्लीला मोठा विजय मिळवून दिला.
मांजरेकर म्हणाले की, खेळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुढे जाण्यासाठी बेल्स काढून टाकल्या पाहिजेत ( Bells should be removed ). चेंडू स्टंपला लागला की नाही हे स्पष्टपणे कळत असल्याने सेन्सॉरकडून निर्णय घेणे सोपे झाले आहे, त्यामुळे बेल्संना क्रिकेटने अलविदा करावा, असा सवाल मांजरेकर यांनी केला, 'पूर्वीची वेळ वेगळी होती. चेंडू स्टंपला लागला की बेल्स खाली पडायची. पण आता तुमच्याकडे सेन्सर आहे. चेंडू स्टंपला लागलाय हे माहीत आहे, मग बेल्स वापरण्याची काय गरज?'
तंत्रज्ञानाची भर पडल्याने खेळातील अडचणी वाढतील, तर बेल्स काढणे सोपे जाईल, असे मत माजी भारतीय क्रिकेटपटूचे आहे. मात्र, या बदलाशी जुळवून घेणे सोपे नसल्याची कबुली त्यांनी दिली. मांजरेकर म्हणाले, 'मला माहित आहे की, अनेक गोष्टी बदलण्यावर आमचा विश्वास नसल्यामुळे असे होऊ शकत नाही. आम्ही काही नियम बदलले आहेत, परंतु काही गोष्टी होऊ शकत नाहीत.
हेही वाचा - IPL 2022 Updates : प्रशिक्षकासोबत फुटबॉल खेळताना दिल्ली कॅपिटल्स संघ, पहा व्हिडिओ