नवी दिल्ली: भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Former Indian cricketer Sanjay Manjrekar) यांनी विराट कोहलीने भारताचे कसोटी कर्णधारपद सोडण्यामागची (Reason for Kohli to step down as Test captain) कारणे सांगितले आहे. ते म्हणाले दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभव झाल्यानंतर फलंदाजाला कर्णधारपद गमावण्याची भीती वाटत होती. म्हणून केपटाऊनमधील तिसर्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 1-2 ने गमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला.
कोहलीने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक वर्तमान आणि माजी क्रिकेटपटूंनी कसोटी संघाला नव्या उंचीवर नेल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. तथापि, ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मांजरेकर म्हणाले (Speaking to ESPN Cricinfo, Manjrekar said) की कोहलीचा कर्णधार म्हणून कार्यकाळ सर्व फॉरमॅटमध्ये खूप लवकर संपला.
मांजरेकर म्हणाले, पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद आणि आयपीएलचे कर्णधारपद त्यांनी अल्पावधीतच सोडले. हे देखील अनपेक्षित होते, परंतु तिन्ही फॉरमॅटमध्ये एकामागून एक राजीनामे इतक्या लवकर आले हे मनोरंजक आहे. विराट कोहलीला (Batsman Virat Kohli) कोणीही कर्णधारपदावरून काढून टाकू नये असे त्याला वाटत होते.
मांजरेकर पुढे म्हणाले, मला वाटते की, कर्णधार म्हणून त्याला कोणत्याही प्रकारे स्वत:ला वाईट सिद्ध करायचं नव्हते. त्यामुळे आता आपले कर्णधारपद धोक्यात आल्याचे जेव्हा त्याला वाटले तेव्हा तो स्वतःच कर्णधारपदावरून पायउतार झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत कोहलीने प्रथमच भारताचे नेतृत्व केले होते. एमएस धोनीने जानेवारी 2015 मध्ये सिडनीतील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला पूर्णवेळ कर्णधार म्हणून भूमिका सोपवण्यात आली होती.
कसोटी कर्णधार म्हणून विराटची कारकिर्द-
खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. एकंदरीत, तो कर्णधार असताना, भारताने 68 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 40 सामने जिंकले आणि 17 सामने गमावले आहेत. तसेच 11 सामने अनिर्णित राहिले. त्यामुळे त्याच्या विजयाची टक्केवारी 58.82 आहे. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने परदेशी आणि देशांतर्गत परिस्थितीत संस्मरणीय विजय नोंदवले. केपटाऊन कसोटी हा भारताचा कर्णधार म्हणून कोहलीचा शेवटचा सामना होता.