पुणे: इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील 39 वा सामना मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore ) संघात खेळला गेला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने बंगळुरूवर 29 धावांनी मात करत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 144 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा डाव 19.3 षटकांत सर्वबाद 115 धावांवर आटोपला. या सामन्यानंतर आरसीबी संघाचे मुख्य कोच संजय बांगर यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
राजस्थानने बंगळुरूवर 29 धावांनी मात करत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले. या विजयात रियान पराग आणि कुलदीप सेनची भूमिका महत्वाची राहिली. त्याचबरोबर माजी कर्णधार विराट कोहली यावेळीही अपयशी ठरला. तो 9 धावा करून बाद झाला, तर सुयश प्रभुदेसाई ( Batsman Suyash Prabhudesai ) पुन्हा एकदा फलंदाजीत अपयशी ठरला आणि अवघ्या दोन धावा करून बाद झाला. आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले, संघ चांगले क्रिकेट खेळत आहे, यावर भर देताना दिसले. तथापि, याआधी, 23 एप्रिल रोजी ब्रेबॉर्नमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 12 षटके आणि 9 विकेट्स राखून संघाचा पराभव झाला होता, कारण त्यांनी केवळ 68 धावा केल्या होत्या.
मुख्य प्रशिक्षक संजय बांगर ( Head Coach Sanjay Bangar ) आरसीबी बोल्ड डायरी शोमध्ये बोलताना म्हणाले, संघ खराब कामगिरीतून किती लवकर सावरतो हा मुद्दा आहे. फलंदाजांनी वेळेनुसार खेळणे महत्त्वाचे आहे. संघ खरोखर चांगले क्रिकेट खेळत आहे. पुढच्या सामन्यात आम्ही जोरदार पुनरागमन करू, असा आम्हाला विश्वास आहे. संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. खेळाडूंनी राजस्थानच्या फलंदाजांवर दडपण ठेवले आणि त्यांना 20 षटकांत 144 धावांपर्यंत रोखले. मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड आणि हसरंगा यांनी चांगली गोलंदाजी करत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तसेच संजय बांगर संघाच्या फलंदाजीच्या क्रमात काही समस्या आहे, त्यात सुधारणा केली जाईल आणि पुढील सामन्यात फलंदाजांनी दमदार पुनरागमन करण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे संघाला गुणतालिकेत फायदा होईल.
हेही वाचा - Mahela Jayawardene Statement : टीव्ही पंचांनी भविष्यात कंबरेवरील फुल टॉस चेंडू पाहण्याची गरज महेला जयवर्धने