ETV Bharat / sports

महेंद्रसिंह धोनीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी साक्षीला दिलं खास गिफ्ट, पाहा फोटो - साक्षी धोनी

महेंद्रसिंह धोनीच्या लग्नाला आज ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने धोनीने पत्नी साक्षीला एक शानदार विंटेज कार गिफ्ट दिली आहे. याची माहिती खुद्द साक्षीने दिली.

sakshi-dhoni-takes-to-instagram-to-reveal-ms-dhoni-gift-on-their-special-day-of-wedding-anniversary
महेंद्रसिंह धोनीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी साक्षीला दिलं खास गिफ्ट, पाहा फोटो
author img

By

Published : Jul 4, 2021, 8:12 PM IST

मुंबई - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. धोनीच्या लग्नाला आज ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने धोनीने पत्नी साक्षीला एक शानदार विंटेज कार गिफ्ट दिली आहे. याची माहिती खुद्द साक्षीने दिली.

sakshi-dhoni-takes-to-instagram-to-reveal-ms-dhoni-gift-on-their-special-day-of-wedding-anniversary
धोनीने पत्नी साक्षीला गिफ्ट केलेली विंजेट कार

साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धोनीने गिफ्ट केलेल्या कारचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत तिने धोनीला 'थँक्यू' म्हटलं आहे. दरम्यान, धोनीने गिफ्ट केलेली कार ही जुन्या काळातील आहे. यामुळे ती नेमकी कोणती कंपनी आणि मॉडेल आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धोनी आणि साक्षीना चाहते सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा देत आहेत.

धोनी आणि साक्षी यांनी ४ जुलै २०१० मध्ये लग्नगाठ बांधली. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या दोघांना एक मुलगी आहे. तिचे नाव जीवा असून तिच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट देखील आहे. तिच्या अकाउंटवरुन साक्षी आणि धोनीचे फोटो शेअर करण्यात येतात.

साक्षीने काही तासांपूर्वीच एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात धोनीच्या विंटेज कारचे कलेक्शन पाहायला मिळाले. सगळ्यांना धोनीचे गाडी प्रेम माहिती आहे. रांचीमध्ये जन्मलेल्या धोनीकडे अनेक लग्जरी कार आहे. ज्यात पोर्चे ९११, फरारी ५९९ जीटीओ, निसान जोंगा, लँड रोवर फ्री लँडर २, आणि ऑडी क्यू ७ चा समावेश आहे.

हेही वाचा - सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनल्यानंतर कसे वाटत आहे? मिताली राजचे ३ शब्दात उत्तर

हेही वाचा - IND vs SL : राहुल द्रविडच्या तालमीत टीम इंडियाने गिरवले क्रिकेटचे धडे, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.