मुंबई - भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा आज ४८वा वाढदिवस असून या निमित्ताने, त्याने प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प केला आहे. तसेच त्याने इतरांनाही प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.
वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिनने खास व्हिडिओ शेअर करत चाहत्याचे आभार मानले आहेत. सचिन म्हणाला की, 'मला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. तुमच्या शुभेच्छांनी माझा आजचा दिवस आणखी खास केला.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान सचिनने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली आहे. याच उल्लेखही त्याने व्हिडिओत केला तो म्हणाला, 'मागील महिना माझ्यासाठी कठीण होता. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मी २१ दिवस आयसोलेट झालो. तुमच्या प्रार्थना व शुभेच्छा, माझ्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या प्रार्थना व शुभेच्छा आणि डॉक्टर्स व मेडिकल स्टाफ... त्यांनी माझ्यात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आणि मला बरं केलं. या सर्वांचे खूप खूप आभार.
सचिनने वाढदिवसांच्या निमित्ताने प्लाझ्मा दान करणार असल्याचे सांगितले. तसेच त्याने इतरांनाही प्लाझ्मा दान करण्याचे आवाहनही केलं.
हेही वाचा - B'day Special: 'ईटीव्ही भारत'चा सचिनच्या वाढदिवसानिमित्त खास आढावा
हेही वाचा - सचिनच्या वाढदिवसानिमित्त जबरा फॅनने तयार केलं अनोखं पोट्रेट