मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने सांघिक खेळ करत भारताचा ८ गडी राखून पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडच्या विजयात वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने अष्टपैलू भूमिका निभावली. आता भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने काइल जेमिसन याच्याविषयी एक भाकित केलं आहे.
सचिन म्हणाला, काइल जेमिसन एक दमदार अष्टपैलू खेळाडू आहे. पुढे जाऊन तो जगातील अग्रणी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होईल. जेव्हा मी त्याला न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा पहिलो. त्याने मला प्रभावित केलं.
इंग्लंडच्या खेळपट्टीवर जेमिसन धोकादायक का ठरला? याचा उलगडा देखील सचिनने यावेळी केला. याविषयी सचिन म्हणाला, 'तुम्ही जर जेमिसनची गोलंदाजी पहिली तर तो खूप उंच आहे आणि स्विंग पेक्षा तो चेंडू सीम करणे जास्त पसंत करतो. टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट आणि नील वॅग्नर यांच्या तुलनेत तो वेगळा गोलंदाज आहे.'
हेही वाचा - IND VS SL : मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, पाहा व्हिडीओ
जेमिसन ताकतीने चेंडू पिचवर फेकतो. त्याने अंतिम सामन्यात अॅगल बनवत इनस्विंगचा मारा केला. त्याच्या गोलंदाजीत विविधता होती आणि त्याचे सातत्य तर मला खूप आवडलं, असेही सचिन म्हणाला.
हेही वाचा - WTC Final :'आक्रमकता आणि मूर्खपणा यात फरक', दिग्गजाने पंतला फटकारलं
पहिल्या डावात त्याने विल्यमसन सोबत न्यूझीलंडसाठी महत्वपूर्व भागिदारी केली. त्याने पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी केली. या दरम्यान, त्याने आपल्या उंचीचा वापर केला. एक उंच फलंदाज फ्रंट फूटवर येणे शानदार आहे, असेही सचिनने म्हणाला.
दरम्यान, जेमिसनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ४४ षटके गोलंदाजी केली. यात त्याने ६१ धावा देत ७ गडी बाद केले. महत्वाच्या सामन्यात त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला दोन्ही डावात बाद केले. याशिवाय त्याने फलंदाजीत पहिल्या डावात २१ धावांचे योगदान दिले.
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक कोठे होणार?; BCCI सचिव जय शाह यांनी दिले महत्त्वाचे अपडेट