ETV Bharat / sports

Faf du Plessis RCB Captain : आरसीबीची धुरा आता फाफ डू प्लेसिसकडे; विराट कोहलीने केली घोषणा - फाफ डू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस आता आरसीबीची कमान संभाळणार ( Faf du Plessis RCB Captain ) आहे. विराट कोहलीने ही घोषणा केली ( Virat Kohli Announce RBC New Captain ) आहे.

Faf du Plessis
Faf du Plessis
author img

By

Published : Mar 12, 2022, 10:29 PM IST

हैदराबाद - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस आता आरसीबीची कमान संभाळणार ( Faf du Plessis RCB Captain ) आहे. विराट कोहलीने 2021 साली आपले कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर आरसीबीचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचे उत्तर आज विराट कोहलीने दिले ( Virat Kohli Announce RBC New Captain ) आहे.

फाफ डू प्लेसिस संघाचा नवीन कर्णधार होणार असल्याची माहिती खुद्द विराट कोहलीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. आरसीबीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने विराटचा एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात बोलताना विराट म्हणाला की, 'नव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. आम्ही नव्या जोमाने आणि उर्जेने नवीन हंगामात उतरु. त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की फाफ संघाचा नवीन कर्णधार असेल,' असे विराटने म्हटले आहे.

डू प्लेसिसने खेळले 100 सामने

डू प्लेसिस 2012 सालापासून इंडियन प्रिमियर लीगचा ( आयपीएलचा ) भाग आहे. चेन्नई सुपर किंग्जने यंदा त्याला सोडल्याने आरसीबीने 7 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीशिवाय तो पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. त्याने आयपीएलमध्ये 100 सामने खेळले असून, 34.94 च्या सरासरीने 2935 धावा केल्या आहेत. तर, आतापर्यंत 22 अर्धशतकांची खेळी डू प्लेसिसने केली आहे.

हेही वाचा - INDw vs WIw: वेस्ट इंडिजला भारताने चाखली धूळ, १५५ धावांनी केला पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.