दुबई: विराट कोहलीने जवळपास तीन वर्षांनंतर शतक ( Virat Kohli century ) झळकावले. त्याच्या 122 धावांमुळे भारताने आशिया कपच्या औपचारिकतेत अफगाणिस्तानविरुद्ध 101 धावांनी विजय नोंदवला. कोहलीने 61 चेंडूत 12 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 122 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने 2 बाद 212 धावा केल्या. कोहलीने आपले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ( Virat Kohli 71st international century ) झळकावून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली. कोहलीचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक ( Virat Kohli first century in T20I ) आहे. विराट कोहलीने तब्बल तीन वर्षांनंतर (1020 दिवस) शतक केले आहे. या सामन्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीची मुलाखत घेतली आहे.
-
What happens when @ImRo45 interviews @imVkohli ☺️ 👏
— BCCI (@BCCI) September 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Laughs, mutual admiration & a lot of respect 😎- by @ameyatilak
Full interview 📽️https://t.co/8bVUaa0pUw #TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvAFG pic.twitter.com/GkdPr9crLh
">What happens when @ImRo45 interviews @imVkohli ☺️ 👏
— BCCI (@BCCI) September 9, 2022
Laughs, mutual admiration & a lot of respect 😎- by @ameyatilak
Full interview 📽️https://t.co/8bVUaa0pUw #TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvAFG pic.twitter.com/GkdPr9crLhWhat happens when @ImRo45 interviews @imVkohli ☺️ 👏
— BCCI (@BCCI) September 9, 2022
Laughs, mutual admiration & a lot of respect 😎- by @ameyatilak
Full interview 📽️https://t.co/8bVUaa0pUw #TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvAFG pic.twitter.com/GkdPr9crLh
या कामगिरीनंतर रोहितने विराटची मुलाखत घेतली ( Rohit Sharma took Virat Kohli interview ). दोघांमध्ये 6 मिनिटे 55 सेकंद बोलणे झाले. त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) शेअर केला आहे. यादरम्यान दोघेही खूप मजेशीर अंदाजात दिसले. विराटला प्रश्न विचारत असताना रोहित शर्मा पूर्णपणे हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करत होता आणि कोहलीला त्याचे हसू येत होते. विराट म्हणाला की, माझ्याशी पहिल्यांदा बोलत असताना तो इतके शुद्ध हिंदी बोलत आहेत. यावर रोहितने सांगितले की, त्याची योजना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा एकत्र बोलण्याची होती, पण जर त्याला हिंदीमध्ये चांगली लय दिसली तर त्याने या भाषेत बोलण्याचा निर्णय घेतला.
विराटने रोहितचे आभार मानले ( Virat Kohli thanked Rohit Sharma ) आणि हा सामना त्याच्यासाठी खूप खास असल्याचे सांगितले. संघ जिंकण्याच्या इराद्याने आला होता आणि आमचे लक्ष्य टी-20 विश्वचषक जिंकण्याचे आहे. मी ब्रेकमधून परत आल्यापासून माझा दृष्टीकोन बदलला आहे. 10-12 वर्षात पहिल्यांदा मी महिनाभर बॅटला हात लावला नव्हता. पुनरागमन केल्यानंतर संघाने स्पष्टपणे सांगितले की, मी माझ्या हिशोबाने खेळावे. विराट कोहली म्हणाला की, या फॉरमॅटमध्ये आपली बॅट शतक झळकावेल, अशी मला अपेक्षा नव्हती. या खेळीने तो स्वत:ही हैराण झाला आहे.
विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक होते आणि सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्याशिवाय रिकी पाँटिंगच्या नावावर 71 शतके आहेत. आता कोहली फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे.