ETV Bharat / sports

एकच वादा 'रोहित' दादा! विक्रमी शतकी खेळीसह रोहितची एकाच सामन्यात तीनदा फलंदाजी

Rohit Sharma Records : भारतीय कर्णधार रोहित शर्मानं बुधवारच्या सामन्यात दमदार शतक ठोकलं. यासह रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील पाचव्या शतकाला गवसणी घातली, असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिल्याच खेळाडू ठरलाय. यासह त्यानं इतरही विक्रम केलेत.

Rohit Sharma Records
Rohit Sharma Records
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 8:12 AM IST

बंगळुरु Rohit Sharma Records : बुधवारी खेळल्या गेलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं वादळी शतक ठोकलं. रोहित शर्मानं टी 20 क्रिकेटमधील पाचव्या शतकाला गवसणी घातली. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये पहिलाच खेळाडू ठरलाय. रोहित शर्मानं केवळ 69 चेंडूत 121 धावांचा पाऊस पाडला. या शतकी खेळीत रोहित शर्मानं 11 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार ठोकले. रोहित शर्मानं या खेळीत अनेक विक्रमही मोडीत काढले.

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पाच शतकं : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पाच शतकं ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय. रोहित शर्मानं सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मागं टाकलंय. सूर्या आणि मॅक्सवेल यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी चार शतकांची नोंद आहे. पाच शतकं ठोकणारा रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी 20 च्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरलाय.

रोहितच्या नावावर अनोखा विक्रम : या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 4 गडी गमावून 212 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्ताननंही 6 विकेट गमावून 212 धावा केल्या आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये पहिला सुपर ओव्हर खेळून अनिर्णित राहिला. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये दुसरा सुपर ओव्हर खेळला गेला. यात भारतीय संघाचा विजय झाला. विशेष म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मानं या तिन्ही प्रसंगी फलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात तीन वेळा फलंदाजी केली, अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.

सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार : भारतीय कर्णधार रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरोधात शतकी खेळी केली. यात आठ गगनचुंबी षटकर ठोकले. यासह आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार म्हणून विक्रम केलाय. तसंच एका टी 20 सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर विक्रम झालाय. याआधी कोणत्याही कर्णधाराला एका सामन्यात आठ षटकार मारता आले नव्हते.

  • भारतासाठी टी 20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या : भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा विक्रमात रोहित शर्माची शतकी खेळी चौथ्या क्रमांकावर आहे. भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या शुभमन गिलच्या नावावर आहे.

T20 मध्ये भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या :

  • 126* शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड अहमदाबाद 2023
  • 123* रुतुराज गायकवाड विरुद्ध औस गुवाहाटी 2023
  • 122* विराट कोहली विरुद्ध अफगाणिस्तान दुबई 2022
  • 121* रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान बंगळूरु 2024

युवराजच्या विक्रमाची बरोबरी : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावांचा विक्रमही रोहित आणि रिंकू यांनी केलाय. रिंकू आणि रोहित यांनी 20 व्या षटकात 36 धावा कुटल्या होत्या. याआधी एकाच षटकात युवराजनं 36 धावा काढल्या. युवराजच्या या विक्रमाचीही बरोबरी झालीय.

भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठी भागिदारी : रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी कठीण परिस्थितीत भारताचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 190 धावांची भागिदारी केली. टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.

  • 190* रोहित शर्मा - रिंकू सिंग विरुद्ध अफगाणिस्तान बंगळूरु 2024
  • 176 संजू सॅमसन - दीपक हुडा विरुद्ध आर्यलँड डब्लिन 2022
  • 165 रोहित शर्मा - केएल राहुल विरुद्ध श्रीलंका इंदूर 2017
  • 165 यशस्वी जैस्वाल - शुभमन गिल विरुद्ध वेस्ट इंडिज लॉडरहिल 2023
  • विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये पहिल्यांदाच गोल्डन डक वर आऊट : बुधवारी झालेल्या तीसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा रन मशीन समजला जाणारा विराट कोहली त्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याच्या कारकिर्दीत तो पहिल्यांदाच पहिल्या चेंडूवर आऊट झाला. अफगाणिस्तानच्या फझल हक फारुखीनं त्याला शुन्यावर बाद केलं.

हेही वाचा :

  1. 'भारतीय संघा'चा 'सुपर' से 'उपर' विजय; बिश्नोईनं तीनच चेंडूत लावला लांबलेल्या सामन्याचा निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.