ETV Bharat / sports

ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत रोहितची भरारी, विराटची घसरण, जो रूट अव्वलस्थानी - joe root

आयसीसीने ताजी कसोटी फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. यात इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि रोहित शर्मा याला फायदा झाला आहे. तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खराब कामगिरीचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. विराट टॉप-5 बाहेर फेकला गेला आहे.

Rohit sharma overtakes virat Kohli as best-ranked Indian batsman at number 5 in ICC Test Player Rankings
ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत रोहितची भरारी, विराटची घसरण, जो रूट अव्वलस्थानी
author img

By

Published : Sep 1, 2021, 3:09 PM IST

दुबई - भारताविरूद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दमदार कामगिरी केली. त्याला या कामगिरीचा फायदा कसोटी रॅकिंगमध्ये झाला आहे. तो जवळपास सहा वर्षांनंतर क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे रोहित शर्माने टॉप-5 मध्ये धडक दिली आहे. तर कर्णधार विराट कोहलीने खराब कामगिरीचा फटका बसला आहे.

30 वर्षीय जो रूट मालिकेला सुरूवात होण्याआधी क्रमवारीत 5 व्या स्थानावर होता. पण तीन कसोटी सामन्यात त्याने 507 धावा करत विराट कोहली, मार्कस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांना मागे टाकले आहे. जो रूट केन विल्यमसनपेक्षा 15 रेटिंग गुणांनी पुढे गेला आहे. रूट लीड्स कसोटी सामन्याच्या आधी दुसऱ्या स्थानावर होता. त्याने या कसोटी सामन्यात 121 धावांची खेळी केली. या खेळीचा त्याला फायदा झाला आहे.

जो रुट डिसेंबर 2015 मध्ये कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला होता. त्यानंतर केन विल्यमसन याने त्याला मागे टाकले होते. यानंतर विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ हे अव्वल ठरले होते. नोव्हेंबर 2015 नंतर या चार खेळाडूंमधील फलंदाज अव्वल क्रमांकावर राहिला होता.

रोहित शर्मा विराट कोहलीला क्रमवारीत मागे टाकले आहे. रोहित शर्माने लीड्स कसोटी सामन्यात पहिल्या डावात 19 तर दुसऱ्या डावात 59 धावांची खेळी केली होती. या खेळीने त्याला एका क्रमाचा फायदा झाला आहे. त्याने कसोटी कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ रॅकिंग मिळवले आहे. विराट कोहलीपेक्षा त्याचे 7 रेटिंग गुण जास्त आहेत. विराट कोहली 766 गुणांसह सहाव्या स्थानावर घसरला आहे.

हेही वाचा - Ind vs Eng : पॉल कॉलिंगवूड यांनी भारतीय संघाच्या वापसीबद्दल काय म्हटलं?

हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.