ETV Bharat / sports

T20I CRICKET : रोहित शर्माने रचला इतिहास ; टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू - played the most T20 matches

भारतीय कर्णधार रोहित शर्माने रविवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला ( World record in T20 international cricket ). 100 हून अधिक टी-20 सामने खेळणारा रोहित एकमेव भारतीय ठरला आहे.

rohit sharma
रोहित शर्मा
author img

By

Published : Feb 28, 2022, 4:09 PM IST

धर्मशाळा : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका पार पडली आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. त्याचबरोबर या मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेवर 3-0 ने मात करत लंकेला क्लीन स्वीप दिला. तत्पुर्वी हा सामना खेळायला उतरताच, कर्णधार रोहित शर्माने एका खास विक्रमाला ( Rohit Sharma record ) गवसणी घातली आहे.

लंकेविरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळायला उतरताच कर्णधार रोहित शर्माने एक विक्रम केला ( Captain Rohit Sharma set a record ) आहे. हा त्याचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील 125 वा सामना होता. हा सामना खेळताच तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा खेळाडू ठरला ( played the most T20 matches ) आहे. त्याने हा कारनामा करताना पाकिस्तानच्या शोएब मलिकला (124 टी-20) मागे टाकले आहे.

तसेच रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू आहे, ज्याने 100 पेक्षा अधिक टी-20 सामने खेळले आहेत. या अगोदर माजी कर्णधार एमएस धोनीने 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर निवृती घेतली होती. त्यानंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ( Star batsman Virat Kohli ) 97 सामने खेळले आहेत. ओवरऑल लिस्टमध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफिज तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 119 टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

रोहित शर्माच्या कामगिरीवर एक दृष्टीक्षेप टाकायचा झाला, तर भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून कमान सांभाळताना, त्याने एका ही सामन्यात पराभव स्विकारला नाही. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिल्या तीन सामन्यांच्या घरच्या मालिकेत क्लीन स्वीपसह सलग तिसऱ्या मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. 2007 च्या T20 विश्वचषकात टी-20 पदार्पण करणाऱ्या या स्टायलिश फलंदाजाने खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 3,308 धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.