लंडन - इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कोरोनावर मात केली असून तो भारतीय संघात परतला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना काही दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. या सुट्टीदरम्यान, ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर ऋषभ पंत लंडनमध्ये एका मित्राच्या घरी क्वारंटाइन होता.
-
Hello @RishabhPant17, great to have you back 😀#TeamIndia pic.twitter.com/aHYcRfhsLy
— BCCI (@BCCI) July 21, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hello @RishabhPant17, great to have you back 😀#TeamIndia pic.twitter.com/aHYcRfhsLy
— BCCI (@BCCI) July 21, 2021Hello @RishabhPant17, great to have you back 😀#TeamIndia pic.twitter.com/aHYcRfhsLy
— BCCI (@BCCI) July 21, 2021
डॉक्टरांकडे गेल्याने ऋषभ पंतला झाला कोरोना?
सुट्टी दरम्यान, ऋषभ पंत वेंबले स्टेडियममध्ये यूरो कप 2020 चा फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेला होता. याशिवाय तो दोन दिवस दंतरोग तज्ञाकडे देखील गेला होता. यात डॉक्टराकडे गेल्यानंतर पंतला कोरोनाची लागण झाल्याचा कयास लावला जात आहे.
बीसीसीआयने शेअर केला ऋषभ पंतचा फोटो
आता ऋषभ पंतने कोरोनावर मात केली असून तो भारतीय संघात परतला आहे. ऋषभ पंतचा क्वारंटाइन कालावधी रविवारी संपला आहे. तो संघासोबत जोडला गेला आहे. बीसीसीसीआयने पंतचा फोटो शेअर करत याची माहिती दिली.
हेही वाचा - India and Sri Lanka : तीन गडी राखून भारताचा श्रीलंकेवर विजय
हेही वाचा - अर्जुन पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन खेळाडूवर का आली शेती करण्याची वेळ?