ETV Bharat / sports

Rinku Singh : आशियाई क्रीडा स्पर्धेत रिंकू सिंह असणार टीम इंडियाचा हुकुमी एक्का - देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिंकू सिंहची कामगिरी

आयपीएल 2023 नंतर आता देवधर ट्रॉफीमध्ये देखील डॅशिंग फलंदाज रिंकू सिंहचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. चीनमध्ये सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची आशा असताना त्याआधी रिंकूचे फॉर्ममध्ये असणे भारतासाठी चांगले संकेत आहेत.

Rinku Singh
रिंकू सिंह
author img

By

Published : Jul 24, 2023, 6:16 PM IST

नवी दिल्ली : आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणारा कोलकाता नाइट रायडर्सचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहने देवधर ट्रॉफीमध्ये आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. आयपीएल नंतर आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही रिंकूची बॅट चांगलीच तळपत आहे.

  • Rinku Singh is the man for the crisis.

    Central Zone, struggling with 68 for 3 in Deodhar Trophy and then scored 54 runs from 63 balls.

    He has 1 hundred & 17 fifties from just 47 innings in List A format. pic.twitter.com/O6xOgT8aN8

    — Johns. (@CricCrazyJohns) July 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दडपणाखाली अर्धशतक झळकावले : सोमवारी मध्य विभागाकडून खेळताना रिंकूने पूर्व विभागाविरुद्ध दडपणाखाली अर्धशतक झळकावून संघाला संकटातून बाहेर काढले. त्याच्या खेळीने संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचला. रिंकूचे फॉर्ममध्ये राहणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण त्याचा सप्टेंबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.

  • Rinku Singh scored 54 in 63 balls with 1 four and 2 sixes for Central Zone in Deodhar Trophy.

    He came in when Central Zone were 118/4, built a great partnership with Karn Sharma. Rinku continues to shine! pic.twitter.com/fi6GgbH7S3

    — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रिंकू आशियाई स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावेल : 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची जबाबदारी युवा डावखुरा फलंदाज रिंकू सिंहवर असणार आहे. भारताला चॅम्पियन बनवण्यात या फिनिशरची भूमिका खूप महत्त्वाची मानली जात आहे, कारण युवा असूनही रिंकू एखाद्या परिपक्व फलंदाजाप्रमाणे खेळतो. त्याने अनेकवेळा आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत सामने जिंकून दिले आहेत. तो परिस्थितीनुसार खेळ खेळतो. त्याला केव्हा टिच्चून फलंदाजी करायची आणि केव्हा वेगवान धावा काढायच्या हे चांगलेच माहीत आहे.

  • Rinku Singh - The Rescuer

    Rinku smashed 54 runs against East Zone in the ongoing Deodhar Trophy to give his team a good total on a difficult pitch.#AmiKKR pic.twitter.com/DSWuCU7C76

    — KnightRidersXtra (@KRxtra) July 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिंकूची कामगिरी : देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिंकू सिंहच्या बॅटने दमदार कामगिरी केली आहे. रिंकूने लिस्ट ए सामन्यांच्या 47 डावांमध्ये 17 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला लवकरच भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

IPL 2023 मध्ये रिंकूची कामगिरी : गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार मारून जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या रिंकू सिंहने IPL 2023 मध्ये खोऱ्याने धावा गोळा केल्या होत्या. रिंकूने या हंगामातील 14 सामन्यात 59.25 ची सरासरी आणि 149.53 च्या स्ट्राईक रेटने एकूण 474 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 अर्धशतकेही झळकावली होती.

हेही वाचा :

  1. Korea Open : सात्विक-चिरागने पटकावले वर्षातील तिसरे विजेतेपद, अंतिम फेरीत केला जगातील नंबर वन जोडीचा पराभव
  2. IND Vs PAK : भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांना मिळेना रूम, आता चक्क हॉस्पिटलमध्ये बुकींग सुरु!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.