मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ( Former Australia captain Ricky Ponting ) म्हटले आहे की, ऋषभ पंत या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या भारताच्या आयसीसी टी-20 विश्वचषक मोहिमेचा अविभाज्य भाग असावा. तो म्हणाला की, सपाट आणि उसळत्या खेळपट्ट्या असल्याने यष्टीरक्षक-फलंदाज "भारतासाठी खुप फायदेशीर आणि विरुद्ध संघांसाठी विलक्षण धोकादायक" ( Rishabh Dangerous Batter T20 World Cup ) असल्याचे सिद्ध होईल.
पाँटिंग म्हणाला, तो (पंत) अप्रतिम खेळाडू आहे. तो भारतासाठी कमालीचा धोकादायक ठरेल. दिल्ली कॅपिटल्समध्ये पंतची ( Delhi Capitals Captain Rishabh Pant ) प्रगती पाहिल्यानंतर, ऑस्ट्रेलियन दिग्गजांना वाटते की यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकादरम्यान पंतचा 'फ्लोटर' म्हणून वापर करावा. 'डायनॅमिक' आणि 'स्फोटक' क्रिकेटपटू लक्षात घेता, पंतला डावखुरा फलंदाज म्हणून विशिष्ट भूमिकेत वापर करायला आवडेल.
ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले की, तो एक स्फोटक खेळाडू आहे. निश्चितपणे मी ते वापरण्याचा प्रयत्न करीत आहे. तो त्याच्या आयपीएलबद्दल खरोखर निराश झाला होता, कारण त्याला या स्पर्धेत अधिक चांगले व्हायचे होते, मी त्याला जितके यापूर्वी कधीही फलंदाजी करताना पाहिले नव्हते आणि त्याने स्वत: आयपीएल दरम्यान मला तेच सांगितले होते. अर्धी स्पर्धा संपल्यानंतर, त्याला योग्य ते निकाल मिळू लागले.
गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक यूएईच्या ( T20 World Cup UAE ) मैदानावर खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये पंतची कामगिरी खूपच खराब झाली होती. स्पर्धेतील 5 सामन्यांमध्ये ऋषभ पंतने 39 च्या सरासरीने आणि 126 च्या स्ट्राईक रेटने एकूण 78 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 39 होती. यावेळी ऑस्ट्रेलियात विश्वचषक होणार आहे. जिथे पंतने 3 T20I सामन्यांच्या दोन डावात फक्त 20 धावा केल्या आहेत.
हेही वाचा - 44th Chess Olympiad : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा लोगो आणि शुभंकर केला लॉन्च