मुंबई - बीसीसीआयने शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. पण, या संघात युवा खेळाडू पृथ्वी शॉ याला स्थान मिळालं नाही. विशेष म्हणजे, शॉ याने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. या दरम्यान, शॉच्या नावाचा इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात विचार का केला गेला नाही. याचे कारण समोर आलं आहे.
एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉ २१ वर्षाच्या असूनही तो खेळपट्टीवर खूप संथ गतीने धावतो. त्याला काही किलो वजन कमी करण्याची गरज आहे. शिवाय निवड समितीने त्याला रिषभ पंतकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला असल्याचे कळते.
ऑस्ट्रेलियात खेळताना सरावादरम्यान त्याच्या एकाग्रतेचा अभाव जाणवला. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर संघातून बाहेर झाल्याने, पृथ्वी पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याच्यासमोर ऋषभ पंतच्या रुपाने ताजे उदाहरण आहे. तो त्याच्याकडून शिकला, तर तोही त्याच्यासारखा होऊ शकतो, असे बीसीसीआयने सांगितलं आहे.
शॉ याने सातत्यपूर्ण खेळ आणखी काही स्पर्धांमध्ये कायम राखायला हवा. एका स्पर्धेच्या कामगिरीवर त्याची भारतीय संघात निवड होते आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरतो. तो चांगला खेळाडू आहे आणि त्याला फार काळ दुलर्क्षित ठेवता येणार नाही, असेही बीसीसीआय स्पष्ट केले.
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव.
लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर
राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जान नागवस्वाला
हेही वाचा - अजिंक्यने टोचून घेतली लस; फोटो शेअर करत देशवासियांना केलं आवाहन
हेही वाचा - प्रसिद्ध कृष्णाला कोरोनाची लागण, केकेआरचा ठरला चौथा खेळाडू