ETV Bharat / sports

Ravindra Jadeja Statement : धोनीवर पूर्ण विश्वास होता, तो संघाला विजय मिळवून देणारच - रवींद्र जडेजा

मुंबई विरुद्ध सामना जिकंल्यानंतर रवींद्र जडेजाने धोनीचे कौतुक केले. तो म्हणाला ( Ravindra Jadeja Statement ), मी धोनी भाईचे अनेक सामने पाहिले आहेत, जिथे त्याने भारतासाठी तसेच आयपीएलमध्ये असे सामने जिंकले आहेत. धोनीची फलंदाजी उत्कृष्ट आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो आणि धोनी क्रीजवर असतो तेव्हा आपण टेन्शन घेऊ नये.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja
author img

By

Published : Apr 22, 2022, 6:09 PM IST

नवी मुंबई: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज ( MI vs CSK ) यांच्यातील आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा 33 वा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर गुरुवारी खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ( Mahendra Singh Dhoni ) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून तीन विकेट्सने संघाला मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा या मोसमात सलग सातवा पराभव झाला आहे. सामन्यानंतर बोलताना रवींद्र जडेजाने धोनीबद्दल महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या ( Tilak Verma's unbeaten half century ) जोरावर, मुंबईने चेन्नईसमोर 156 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले होते. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावून 156 धावा केल्या. ज्यामध्ये चेन्नईच्या माजी कर्णधार धोनीने 215.38 च्या स्ट्राइक रेटने 13 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या.

चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा सामन्यानंतरच्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ( Ravindra Jadeja's Virtual Press Conference ) बोलताना म्हणाला, मी धोनी भाईचे अनेक सामने पाहिले आहेत, जिथे त्याने भारतासाठी तसेच आयपीएलमध्ये असे सामने जिंकले आहेत. धोनीची फलंदाजी उत्कृष्ट आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो आणि धोनी क्रीजवर असतो तेव्हा आपण टेन्शन घेऊ नये. कारण त्यांनी यापूर्वीही संघाच्या विजयासाठी गोलंदाजांशी संघर्ष केला आहे आणि आजही ते तेच करत आहे.

  • Our Top Performer from the second innings is MS Dhoni for his match-winning knock of 28* off 13 deliveries as he takes #CSK home.

    A look at his batting summary here 👇👇 #TATAIPL pic.twitter.com/9xkWzFRb5T

    — IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

धोनीशिवाय चेन्नईकडे डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीही होता, ज्याने मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावून मुंबईला अडचणीत आणले. त्याने महत्त्वाचे तीन बळी घेतले. चौधरीला सामन्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' ( Mukesh Chaudhary Player of the Match ) म्हणून सन्मानित करण्यात आले, तो चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि संघासाठी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला.

हेही वाचा - IPL 2022 Updates : मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावणारा मुकेश चौधरी आहे कोण, जाणून घ्या एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.