मुंबई: मंगळवारी (12 एप्रिल) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 22 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( CSK vs RCB ) संघात खेळला गेला. डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात, सीएसकेने आरसीबीवर 23 धावांनी मात करत आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. आपल्या या पहिल्या विजयानंतर कर्णधार रवींद्र जडेजाने महत्वाची प्रतिक्रिया ( Ravindra Jadeja Statement ) दिली आहे.
-
What a game this at the DY Patil Stadium.#CSK register their first win in #TATAIPL 2022
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/KYzdkMrSTA #CSKvRCB #TATAIPL pic.twitter.com/J8C8sZuxk1
">What a game this at the DY Patil Stadium.#CSK register their first win in #TATAIPL 2022
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
Scorecard - https://t.co/KYzdkMrSTA #CSKvRCB #TATAIPL pic.twitter.com/J8C8sZuxk1What a game this at the DY Patil Stadium.#CSK register their first win in #TATAIPL 2022
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
Scorecard - https://t.co/KYzdkMrSTA #CSKvRCB #TATAIPL pic.twitter.com/J8C8sZuxk1
सीएसकेने मंगळवारी रॉबिन उथप्पा ( Robin Uthappa ) (88) आणि शिवम दुबे ( Shivam Dubey ) यांनी नाबाद (95) धावांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore ) ला 23 धावांनी पराभूत करून पाच सामन्यांमध्ये पहिला विजय नोंदवला. त्यानंतर कर्णधारपद स्वीकारल्यापासून टीकेचा धनी झालेला रवींद्र जडेजाने विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
पहिला विजय मी माझ्या पत्नीला समर्पित करू इच्छितो - रवींद्र जडेजा
सामन्यानंतर जडेजा ( Ravindra Jadeja Said on 1st win ) म्हणाला, कर्णधार म्हणून मी अजूनही वरिष्ठ खेळाडूंकडून धडे घेत आहे. मी नेहमी धोनीभाईंसोबत कर्णधारपदावर ( Ravindra Jadeja captaincy ) चर्चा करतो. मी अजूनही शिकत आहे आणि प्रत्येक गेममध्ये चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जडेजाने आरसीबीविरुद्ध चार षटकांत 39 धावा देत तीन बळी घेतले. तो पुढे म्हणाला, आम्हाला अनुभव आहे आणि खेळातून अनुभव येतो, आम्ही लवकर घाबरत नाही. आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळायचे आहे.
तो म्हणाला, हा विजय मी माझ्या पत्नीला समर्पित करू इच्छितो. कारण पहिला विजय नेहमीच खास असतो. एक फलंदाज म्हणून, रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी चमकदार फलंदाजी करताना सर्वजण चांगले खेळले. त्याचबरोबर गोलंदाजांनीही चेंडूने हातभार लावला.
माजी क्रिकेटपटू युवराज सिंग माझा आदर्श - शिवम दुबे
सामन्यानंतर दुबे म्हणाला, आम्ही पहिल्या विजयाच्या शोधात होतो आणि मी संघासाठी योगदान दिल्याचा मला खरोखर आनंद आहे. विजयात योगदान देणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. यावेळी मी खेळावर अधिक लक्ष देईन. माही भाईनेही मला माझा खेळ सुधारण्यास मदत केली. तो म्हणाला, फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. दुबे म्हणाला की, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग हा त्यांचा एक आदर्श होता. तो पुढे म्हणाला की संघाच्या कोणत्याही परिस्थितीत फलंदाजीसाठी तो नेहमीच तयार असतो.
-
Want to dedicate my award to my father: Shivam Dube#TATAIPL #CSKvRCB @IamShivamDube pic.twitter.com/zKKZVenBlZ
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Want to dedicate my award to my father: Shivam Dube#TATAIPL #CSKvRCB @IamShivamDube pic.twitter.com/zKKZVenBlZ
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022Want to dedicate my award to my father: Shivam Dube#TATAIPL #CSKvRCB @IamShivamDube pic.twitter.com/zKKZVenBlZ
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
दुबेला जास्तीत जास्त स्ट्राइक मिळवून देण्याचा प्रयत्न केला - रॉबिन उथप्पा
73 चेंडूत 165 धावांची विक्रमी भागीदारी करताना आपली रणनीती स्पष्ट करताना उथप्पा म्हणाला की, दुबेशी माझे फारसे बोलणे झाले नाही. तो चेंडू चांगलाच मारत होता. यादरम्यान मी त्याच्यासोबत चांगली भागीदारी केली. जेव्हा मॅक्सवेल तिसरे षटक टाकायला आला तेव्हा मला वाटले की, धावा काढण्याची वेळ आली आहे आणि आम्ही दोघांनीही तसेच केले. तो पुढे म्हणाला, जेव्हा फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत होते, तेव्हा मी दुबेला जास्तीत जास्त स्ट्राइक मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कारण तो चेंडूचे षटकारात रूपांतर करण्याचा प्रयत्न करत होता. वेगवान गोलंदाज परत आल्यावर मी त्यांच्याकडून स्ट्राइक परत घेतली.
-
Counter-attacking knocks 💪
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Game-changing partnership 🔥
Clinical victory ✅
Showstoppers @robbieuthappa & @IamShivamDube sum up @ChennaiIPL's win against #RCB. 👍 👍 - By @ameyatilak
Full interview 🎥 🔽 #TATAIPL | #CSKvRCB https://t.co/15UVuNcdr6 pic.twitter.com/i8fAcFTP1D
">Counter-attacking knocks 💪
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
Game-changing partnership 🔥
Clinical victory ✅
Showstoppers @robbieuthappa & @IamShivamDube sum up @ChennaiIPL's win against #RCB. 👍 👍 - By @ameyatilak
Full interview 🎥 🔽 #TATAIPL | #CSKvRCB https://t.co/15UVuNcdr6 pic.twitter.com/i8fAcFTP1DCounter-attacking knocks 💪
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
Game-changing partnership 🔥
Clinical victory ✅
Showstoppers @robbieuthappa & @IamShivamDube sum up @ChennaiIPL's win against #RCB. 👍 👍 - By @ameyatilak
Full interview 🎥 🔽 #TATAIPL | #CSKvRCB https://t.co/15UVuNcdr6 pic.twitter.com/i8fAcFTP1D
हेही वाचा - IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला सूर गवसला, बंगळुरूवर मिळवला पहिला विजय