नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केल्याबद्दल चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरीस सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या रवींद्र जडेजाबद्दल सर्व प्रकारच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. आगामी आयपीएल हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो, असे मानले जात आहे.
जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन : आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा एक्स-फॅक्टर असेल असे भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला वाटते. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे अनेक महिने मैदानाबाहेर राहिल्यानंतर जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2022-23 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
हरभजनने केले वक्तव्य : मागील वर्षी आयपीएल हंगाम चांगला नसल्यामुळे डावखुरा फिरकीपटू चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी कसा खेळतो हे पाहणे मनोरंजक असेल. तो म्हणाला, सर्वांनी एका व्यक्तीकडे लक्ष ठेवले पाहिजे ते म्हणजे रवींद्र जडेजाकडे. विशेषत: तो सीएसकेसाठी कसा फलंदाजी करतो. त्याला क्रमवारीत बढती मिळू शकते आणि तो एक चांगला गोलंदाजही आहे. हरभजनने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, जर तुम्ही जागतिक क्रिकेटच्या दृष्टिकोनातून बघितले तर मला वाटत नाही की, त्याच्यापेक्षा चांगला अष्टपैलू कोणी असेल. त्यामुळेच मी रवींद्र जडेजाला आयपीएलमध्ये पाहण्याची वाट पाहत आहे.
धोनी फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद : यापूर्वी सीएसकेकडून खेळलेला माजी भारतीय फिरकीपटू म्हणाला की, धोनी फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद आहे. तो संघाला चांगल्याप्रकारे ओळखतो आणि संघातील प्रत्येक खेळाडूचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तो सर्वोत्तम व्यक्ती आहे. तो म्हणाला, सीएसकेचा सर्वात मोठा घरचा फायदा म्हणजे त्याचे चाहते, जे संघाचे मनोबल वाढवतात. सीएसकेचे चाहते असे आहेत की संघ जिंकला किंवा हरला तरी ते त्यांना नेहमीच साथ देतात.
हेही वाचा : WPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने लगावला विजयी चौकार, आरसीबीचा सलग पाचवा पराभव