ETV Bharat / sports

रवी शास्त्री, भरत अरूण आणि आर. श्रीधर यांची कोरोनावर मात, तरी देखील त्यांना इंग्लंडमध्ये थांबवलं - Bharat Arun

रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. यात निगेटिव्ह आले. पण त्यांना अद्याप विमान प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांना फिट टू फ्लायसाठी आणखी एक चाचणी द्यावी लागणार आहे.

shastri-arun-and-sridhar-await-fit-to-fly-certificate-to-return-home
रवी शास्त्री, भरत अरूण आणि आर. श्रीधर यांची कोरोनावर मात, तरी देखील त्यांना इंग्लंडमध्ये थांबवलं
author img

By

Published : Sep 16, 2021, 8:03 PM IST

लंडन - भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांना कोरोनाची लागण झाली. यामुळे ते ब्रिटनच्या आरोग्य प्रोटोकॉलनुसार, 10 दिवसांसाठी क्वारंटाइन झाले. क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. यात निगेटिव्ह आले. पण त्यांना अद्याप विमान प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांना फिट टू फ्लाय साठी आणखी एक चाचणी द्यावी लागणार आहे. दरम्यान, भारतीय ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने मागील आठवड्यात मँचेस्टर येथे होणारा इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागला होता.

बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, रवी शास्त्री, भरत अरूण आणि आर. श्रीधर हे कोरोनावर मात केल्यानतर स्वस्थ आहेत. त्यांनी क्वारंटाइनचा कालावधी देखील पूर्ण केला आहे. पण ब्रिटनच्या आरोग्य प्रोटोकॉलनुसार विमानाने प्रवास करण्यासाठी आणखी एक चाचणी द्यावी लागणार आहे. त्यांचा सीटी स्कोर तपासला जाणार आहे. यात त्यांचा सीटी स्टोर 38 पेक्षा जास्त असला तरच त्यांना प्रवासासाठी परवानगी दिली जाणार आहे. आम्हाला आशा आहे की, ते पुढील दोन दिवसात मायदेशी परतण्यासाठी निघतील.

सीटी स्कोरमधून कोरोना बाधित व्यक्तीचं कोरोना व्हायरसने किती नुकसान केले आहे, हे कळते. त्याच्या फुफ्फुसात किती संसर्ग पसरला आहे हे कळते. जर सिटी स्कोर जास्त असेल तर तो व्यक्ती कोरोनामधून सावरला आहे, असे मानले जाते. लांब पल्ल्याच्या विमान प्रवासासाठी ब्रिटनने प्रत्येकाचा सीटी स्कोर 40 असायला हवा, असा नियम केला आहे.

भारताचे तिन्ही प्रशिक्षकांची प्रकृती आता चांगली आहे. त्याच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मायदेशी परतण्यासाठी निघतील.

रवी शास्त्री यांना चौथ्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवशी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. भरत अरूण आणि आर श्रीधर हे शास्त्रींच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांना क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. क्वारंटाइन दरम्यान त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर बुधवारी तिघांनी 10 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला.

भारतीय संघाचे ज्यूनियर फिजिओ योगेश पारमार कोरोनाबाधित आढळले. तेव्हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना स्थगित करण्यात आला होता. रवी शास्त्री एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला गेले होते. यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - IPL 2021: प्रेक्षकांसमोर खेळण्याबाबत इयॉन मॉर्गन आणि ब्रँडन मॅक्युलम काय म्हणाले?

हेही वाचा - मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.