अहमदाबाद - देशांतर्गंत क्रिकेट स्पर्धांमधील सर्वात मोठी रणजी ट्रॉफी स्पर्धेला ( Ranji Trophy Tournament ) आजपासून (गुरुवार) सुरुवात झाली आहे. रणजी ट्रॉफी 2022 या स्पर्धतील मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई संघाकडून खेळताना अजिंक्य रहाणेने शतक ( Ajinkya Rahane century against Saurashtra) झळकावले आहे. अजिंक्य रहाणेने 212 चेंडूचा सामना करताना 100 धावांची खेळी साकारली आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेले.
-
𝘈𝘢𝘵𝘦 𝘩𝘪 𝘴𝘩𝘶𝘳𝘶! @ajinkyarahane88 opening the #RanjiTrophy2022 season with a fine half-century! 💜💛
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
#SAUvMUM #CricketTwitter pic.twitter.com/m7PRKjvPOy
">𝘈𝘢𝘵𝘦 𝘩𝘪 𝘴𝘩𝘶𝘳𝘶! @ajinkyarahane88 opening the #RanjiTrophy2022 season with a fine half-century! 💜💛
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 17, 2022
#SAUvMUM #CricketTwitter pic.twitter.com/m7PRKjvPOy𝘈𝘢𝘵𝘦 𝘩𝘪 𝘴𝘩𝘶𝘳𝘶! @ajinkyarahane88 opening the #RanjiTrophy2022 season with a fine half-century! 💜💛
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 17, 2022
#SAUvMUM #CricketTwitter pic.twitter.com/m7PRKjvPOy
मुंबईची धावसंख्या 22/2 अशी होती तेव्हा रहाणेने खडतर पॅचमधून आपल्या संघाला बाहेर काढले. 12 व्या षटकात त्यांनी संघसहकारी सचिन यादवला गमावले, परंतु सर्फराज खानने (85) रहाणेसह मुंबईच्या डावाला (219/3) सावरले. या अगोदर दिल्लीचा फलंदाज यश धुलने चालू असलेल्या रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप एच ( Ranji Trophy Elite Group H ) स्पर्धेत प्रथम श्रेणी पदार्पणात आपल्या शतकाची नोंद केली आहे.
-
1⃣1⃣3⃣ Runs
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1⃣5⃣0⃣ Balls
1⃣8⃣ Fours
Playing his maiden First Class game, Yash Dhull kickstarted his Ranji Trophy journey with a fantastic ton for Delhi. ⚡️ ⚡️ #RanjiTrophy | #DELvTN | @Paytm | @YashDhull2002
Watch that knock 🎥 🔽https://t.co/j7Q6OSzSI5 pic.twitter.com/3LKuEIyLbY
">1⃣1⃣3⃣ Runs
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2022
1⃣5⃣0⃣ Balls
1⃣8⃣ Fours
Playing his maiden First Class game, Yash Dhull kickstarted his Ranji Trophy journey with a fantastic ton for Delhi. ⚡️ ⚡️ #RanjiTrophy | #DELvTN | @Paytm | @YashDhull2002
Watch that knock 🎥 🔽https://t.co/j7Q6OSzSI5 pic.twitter.com/3LKuEIyLbY1⃣1⃣3⃣ Runs
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2022
1⃣5⃣0⃣ Balls
1⃣8⃣ Fours
Playing his maiden First Class game, Yash Dhull kickstarted his Ranji Trophy journey with a fantastic ton for Delhi. ⚡️ ⚡️ #RanjiTrophy | #DELvTN | @Paytm | @YashDhull2002
Watch that knock 🎥 🔽https://t.co/j7Q6OSzSI5 pic.twitter.com/3LKuEIyLbY
गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या एलिट ग्रुप एच स्पर्धेत धुलने तामिळनाडूविरुद्ध शतक ( Yash Dhul century against Tamil Nadu ) झळकावले. सलामीला पाठवलेल्या धुलने अवघ्या 133 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. 97 धावांवर धुलला एम मोहम्मदने बाद केले होते. परंतु चेंडू नो-बॉल असल्याने दिल्लीच्या युवा फलंदाजाला दिलासा मिळाला.
यश धुलने भारताला आयसीसीच्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत ( ICC Under-19 World Cup ) पाचव्यांदा विजतेपद मिळवून दिले होते. यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला फायनल सामन्यात मात देत विजेतेपद पटकावले होते. रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात होणार असून, पुढील टप्पा आयपीएलनंतर 30 मे ते २६ जून या कालावधीत होणार आहे. या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये 62 दिवसांत 64 सामने खेळवले जाणार आहेत.