मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामात आयपीएलच्या पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्स संघाची ( Rajasthan Royals Team ) कामगिरी शानदार राहिली आहे. या संघाने आतापर्यंत अकरा सामन्यात सात विजय नोंदवत 14 गुणांनी गुणतालिकेत तिसरे स्थान काबीज केले आहे. शनिवारी पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानला शिमरॉन हेटमायरने दमदार विजय मिळवून दिला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून एक मोठी बातमी समोर आली आहे.
-
Have a good weekend, Royals. 💗 pic.twitter.com/MB3Nwg7Rmd
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Have a good weekend, Royals. 💗 pic.twitter.com/MB3Nwg7Rmd
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 7, 2022Have a good weekend, Royals. 💗 pic.twitter.com/MB3Nwg7Rmd
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 7, 2022
राजस्थान रॉयल्स संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर ( Star batsman Shimron Hetmyer ) बायो-बबल सोडून गयानाला परतला आहे. याबाबत अधिकृत माहिती राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने दिली आहे. फ्रेंचायझीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तथापि, हेटमायरने तात्पुरते बायो बबल सोडले आहे आणि लवकरच तो राजस्थानमध्ये परत येईल. फ्रँचायझीने एक निवेदन जारी केले की हेटमायर प्रथमच वडील झाला ( Shimron Hetmyer first time father ) आणि म्हणूनच तो बायो बबल सोडून गयानाला गेला. हेटमायरचा प्री-डिपार्चर व्हिडिओ फ्रँचायझीने ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि त्यात तो खूप आनंदी दिसत आहे.
-
Shimron Hetmyer has travelled back to Guyana early morning today for the imminent birth of his first child, but he’ll be back soon. 💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read more: https://t.co/cTUb3vFiNl#RoyalsFamily | @SHetmyer pic.twitter.com/u52aO9Dcct
">Shimron Hetmyer has travelled back to Guyana early morning today for the imminent birth of his first child, but he’ll be back soon. 💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2022
Read more: https://t.co/cTUb3vFiNl#RoyalsFamily | @SHetmyer pic.twitter.com/u52aO9DcctShimron Hetmyer has travelled back to Guyana early morning today for the imminent birth of his first child, but he’ll be back soon. 💗
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2022
Read more: https://t.co/cTUb3vFiNl#RoyalsFamily | @SHetmyer pic.twitter.com/u52aO9Dcct
राजस्थान संघाने ( Rajasthan Royals team Performance ) या मोसमात चांगली कामगिरी केली असून आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी सात सामने जिंकले तर चार सामन्यात पराभव झाला आहे. 14 गुणांसह राजस्थानचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानने सातत्याने टॉप-4 मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. या संघाच्या मागील पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर त्यापैकी तीन सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. राजस्थान प्ले-ऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे.
-
Sanju’s energy >>>> 💗 pic.twitter.com/c0HX0fdxBt
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sanju’s energy >>>> 💗 pic.twitter.com/c0HX0fdxBt
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 7, 2022Sanju’s energy >>>> 💗 pic.twitter.com/c0HX0fdxBt
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 7, 2022
राजस्थानच्या खेळाडूंची कामगिरी इतकी जबरदस्त राहिली आहे की सध्या राजस्थानच्या कॅम्पमध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅप दोन्ही आहेत. शिमरॉन हेटमायरबद्दल बोलायचे, तर तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेटमायरने या मोसमात 11 सामन्यांमध्ये 72 पेक्षा जास्त सरासरीने 291 धावा केल्या आहेत. त्याने या मोसमात एक अर्धशतक ठोकले आहे आणि 166.29 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
हेही वाचा - Ipl 2022 Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत पुन्हा वाढ; 'या' गोलंदाजाला झाली कोरोनाची लागण