मुंबई: जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. त्या अगोदर राजस्थान रॉयल्स संघाच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी लसिथ मलिंगाची ( Lasith Malinga as fast bowling coach ) नियुक्ती केली आहे. त्यानंतर आता लसिथ मलिंगाने रॉजस्थान रॉयलच्या वेगवान गोलंदाजांच्या स्कॉडबाबत एक वक्तव्य केले आहे. त्याच्या मते, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनी यांच्या रुपाने जो ग्रुप आहे, तो भविष्यात आंतरराष्ट्रीय स्थरावर स्टार बनू शकतात.
-
Lasith Malinga, he's still got it! 💗🤩#RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/zvOVCQOsga
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Lasith Malinga, he's still got it! 💗🤩#RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/zvOVCQOsga
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 20, 2022Lasith Malinga, he's still got it! 💗🤩#RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/zvOVCQOsga
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 20, 2022
राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामिल झाल्यानंतर मलिंगा म्हणाला ( Lasith Malinga statement on RR ) , की कोचिंगसाठी जाणे आणि युवा खेळाडूंना माझा अनुभव देणे, हे माझ्यासाठी निश्चित रुपाने नवीन आहे. मी या अगोदर ही भूमिका मुंबई संघासोबत निभावली होती. आता राजस्थान रॉयल्स संघासाठी ही भूमिका निभावण्यासाठी मी खुश आहे. माझ्यासाठी हे एक नवीन ठिकाण आहे, पण अशा प्रतिभावान गोलंदाजांसोबत काम करताना मी आतापर्यंतच्या माझ्या भूमिकेचा आनंद घेत आहे.
-
Lasith Malinga, wasting no time. 👏#RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/GruPXn7AuC
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Lasith Malinga, wasting no time. 👏#RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/GruPXn7AuC
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 21, 2022Lasith Malinga, wasting no time. 👏#RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/GruPXn7AuC
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 21, 2022
मलिंगा म्हणाला, "मला वाटते की आमच्याकडे शानदार वेगवान आक्रमण आहे. आमच्याकडे बोल्ट आणि कुल्टर-नाईलसारखे अनुभवी परदेशी खेळाडू आहेत, ज्यांच्यासोबत मी यापूर्वी काम केले आहे. त्यानंतर आमच्याकडे प्रसिद्ध आणि सैनी हे अस्सल भारतीय वेगवान गोलंदाज आहेत, ज्यांनी स्वतःला सर्वोच्च स्तरावर सिद्ध केले आहे. अनुनय सिंग, कुलदीप सेन आणि कुलदीप यादव हे काही नवीन चेहरे आहेत. T20 क्रिकेटमध्ये, मला वाटते की थोडे फरक महत्त्वाचे आहेत आणि सर्व परिस्थितीत त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे आहे."
नवीन संघाबद्दल विचारले असता मलिंगा म्हणाला, मी नेहमी या संघातून चांगले आणि स्थानिय आंतरराष्ट्रीय खेळाडू पाहिले आहेत. जेव्हा मी त्यांचा सामना करायचो, तेव्हा माझ्यासाठी अवघड जायचे. मला वाटते ते असे प्रतिस्पर्धी होते, जे आपल्या काळात कोणत्याही संघाला पराभूत करु शकत होते.
-
2 in 1. 🔥📹 #RoyalsFamily | @IamSanjuSamson | @yashasvi_j | #TATAIPL2022 pic.twitter.com/VdSgCplabf
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2 in 1. 🔥📹 #RoyalsFamily | @IamSanjuSamson | @yashasvi_j | #TATAIPL2022 pic.twitter.com/VdSgCplabf
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 21, 20222 in 1. 🔥📹 #RoyalsFamily | @IamSanjuSamson | @yashasvi_j | #TATAIPL2022 pic.twitter.com/VdSgCplabf
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 21, 2022
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, राजस्थान रॉयल्सच्या संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकदाच विजेतेपद पटकावले आहे. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आजपर्यंत या संघाला विजेतेपद मिळवता आलेले नाही. दरवर्षी रॉयल्स संघ विजेतेपदाच्या शोधात स्पर्धा खेळण्यासाठी येतो.
राजस्थान रॉयल्स संघ:
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, करुण नायर, रायसे व्हॅन डर ड्युसेन, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, डॅरिल मिशेल, अनुनय सिंग, रियान पराग, शुभम गढवाल, रवी अश्विन, जेम्स नीशम, कुलदीप सेन, नवदीप सेन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर-नाईल, ओबेद मॅककॉय, प्रसिद्ध कृष्णा, केसी करिअप्पा, तेजस बारोका, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव.