ETV Bharat / sports

R Ashwin Record : अश्विनचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा रेकॉर्ड!, कोणालाही असे करणे अशक्यच - रविचंद्रन अश्विनचा रेकॉर्ड

रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात तेजनारायण चंद्रपॉलची विकेट घेतली. त्याचबरोबर तो कसोटी क्रिकेटमध्ये पिता आणि पुत्रांची विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.

R Ashwin
रविचंद्रन अश्विन
author img

By

Published : Jul 12, 2023, 10:49 PM IST

मुंबई : भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एक अजब रेकॉर्ड केला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पिता-पुत्रांच्या जोडीला बाद करणारा अश्विन पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

पिता आणि पुत्रांची विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज : अश्विनने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात तेजनारायण चंद्रपॉलची विकेट घेतली. त्याचबरोबर तो कसोटी क्रिकेटमध्ये पिता आणि पुत्रांची विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. तेजनारायण चंद्रपॉलचे वडील शिवनारायण चंद्रपॉल देखील वेस्ट इंडीजसाठी क्रिकेट खेळायचे. अश्विनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत शिवनारायणलाही बाद केले आहे.

अश्विनने चंद्रपॉलला बोल्ड केले : भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अश्विनने यजमान संघाची पहिली विकेट घेतली. वेस्ट इंडिजचा तेजनारायण चंद्रपॉल कर्णधार क्रेग ब्रॅथवेटसह सलामीला आला. दोघेही क्रीजवर जमण्याचा प्रयत्न करत होते, तोच अश्विनने 13 व्या षटकात ही भागीदारी मोडली. विंडीजच्या पहिल्या डावातील 13 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर अश्विनने चंद्रपॉलला बोल्ड केले. त्याने 44 चेंडूत 12 धावा केल्या. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी झाली.

आणखी एक विक्रम आपल्या नावे केला : या विकेटसह अश्विनने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अश्विन कसोटीत फलंदाजांना सर्वात जास्त वेळा बोल्ड करणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. अश्विनने कसोटीत सर्वाधिक फलंदाजांना बोल्ड केले आहे. त्याने फलंदाजांना 95 वेळा बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. या आधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावे होता. त्याने फलंदाजांना 94 वेळा बोल्ड केले आहे.

कसोटीत सर्वाधिक वेळा फलंदाजांना बोल्ड बाद करणारे भारतीय गोलंदाज :

  1. रविचंद्रन अश्विन - 95 वेळा
  2. अनिल कुंबळे - 94 वेळा
  3. कपिल देव - 88 वेळा
  4. मोहम्मद शमी - 66 वेळा

हेही वाचा :

  1. Lakshya Sen : 21 वर्षीय लक्ष्य सेनने पटकावले कॅनडा ओपन स्पर्धेचे विजेतेपद
  2. Sunil Gavaskar Birthday : भारतीय क्रिकेटचे पहिले सुपरस्टार...'लिटिल मास्टर' गावस्कर झाले 74 वर्षांचे!
  3. Sourav Ganguly Birthday : क्रिकेटचा 'दादा'...ज्याने टीम इंडियाला लावली जिंकण्याची सवय!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.