नवी दिल्ली : पीएसएलमध्ये रविवारी मुलतान-सुलतान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना झाला. मुलतान-सुलतानने हा सामना 9 धावांनी जिंकला. या सामन्यात मुलतानचा सलामीवीर उस्मानने 43 चेंडूत 120 धावांची खेळी केली. उस्मानने या खेळीत 12 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे मुलतानने 20 षटकांत 3 गडी गमावून 262 धावा केल्या.
-
𝙁𝘼𝙎𝙏𝙀𝙎𝙏 100 𝙊𝙁 𝙏𝙃𝙀 𝙃𝘽𝙇𝙋𝙎𝙇 𝙁𝙊𝙍 𝙐𝙎𝙈𝘼𝙉 𝙆𝙃𝘼𝙉 🕺🏻🤩
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
His Skipper is happy, his team is happy, HE IS HAPPY! #HBLPSL8 | #SabSitarayHumaray | #QGvMS pic.twitter.com/QnY94Gv62w
">𝙁𝘼𝙎𝙏𝙀𝙎𝙏 100 𝙊𝙁 𝙏𝙃𝙀 𝙃𝘽𝙇𝙋𝙎𝙇 𝙁𝙊𝙍 𝙐𝙎𝙈𝘼𝙉 𝙆𝙃𝘼𝙉 🕺🏻🤩
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 11, 2023
His Skipper is happy, his team is happy, HE IS HAPPY! #HBLPSL8 | #SabSitarayHumaray | #QGvMS pic.twitter.com/QnY94Gv62w𝙁𝘼𝙎𝙏𝙀𝙎𝙏 100 𝙊𝙁 𝙏𝙃𝙀 𝙃𝘽𝙇𝙋𝙎𝙇 𝙁𝙊𝙍 𝙐𝙎𝙈𝘼𝙉 𝙆𝙃𝘼𝙉 🕺🏻🤩
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 11, 2023
His Skipper is happy, his team is happy, HE IS HAPPY! #HBLPSL8 | #SabSitarayHumaray | #QGvMS pic.twitter.com/QnY94Gv62w
सर्वात वेगवान शतक : पीएसएलचे सर्वात वेगवान शतक उस्मानच्या बॅटमधून झळकले. उस्मानने केवळ 36 चेंडूत शतक झळकावले. पीएसएलच्या २८व्या सामन्याची इतिहासात नोंद झाली. उस्मानने रिले रोसोचा नुकताच केलेला वेगवान शतकाचा विक्रम मोडला. रिलेने 10 मार्च रोजी पेशावर झल्मीविरुद्ध 41 चेंडूत पीएसएलमधील सर्वात जलद शतक झळकावले. पण त्याचा हा विक्रम लवकरच मोडीत निघाला. उस्मान खानच्या कामगिरीने प्रेक्षक खूश झाले आहेत.
क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्ध सामना : याआधीही रिलेने सर्वात जलद शतक झळकावले होते. 2020 पीएसएल हंगामात रिलेने 43 चेंडूत शतक झळकावले. क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्ध त्याने हे शतक झळकावले. जेसन रॉयनेही पीएसएलमध्ये ४४ चेंडूत शतक झळकावले आहे. 8 मार्च 2023 रोजी रावळपिंडी येथे झालेल्या सामन्यात रॉयने हा पराक्रम केला होता. जेसन व्यतिरिक्त, हॅरी ब्रूकने 19 फेब्रुवारी 2022 रोजी लाहोरमध्ये 48 चेंडूत सर्वात जलद शतक झळकावले होते.
उस्मान खान आणि मोहम्मद रिझवान : मुलतान-सुलतानसाठी उस्मान खान आणि मोहम्मद रिझवानने सामन्याची सुरुवात केली. दोघांनी शानदार सुरुवात करत 157 धावांची भागीदारी केली. रिझवानने 29 चेंडू खेळून 6 चौकार आणि 2 षटकारांसह 55 धावा केल्या. मुलतानने निर्धारित षटकात 262 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात क्वेटा ग्लॅडिएटर्सचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावून केवळ 253 धावाच करू शकला. क्वेटाच्या उमर युसूफने सर्वाधिक ६७ धावा केल्या. इफ्तिखार अहमदनेही ५३ धावांची खेळी केली.
हेही वाचा : DC VS GG WPL 2023 : दिल्लीचा गुजरातवर दणदणीत विजय, शफाली आणि मॅरिझान ठरल्या स्टार खेळाडू