ETV Bharat / sports

PREVIEW: आरसीबी आणि पंजाब किंग्सची अजून ही पहिल्या विजेतेपदावर नजर; दोन्ही संघ आज नव्याने करणार सुरुवात - आयपीएलच्या मराठी बातम्या

आरसीबी आणि पंजाब किंग्स ( RCB and Punjab Kings ) या दोन्ही संघांची धुरा अनुक्रमे फाफ डु प्लेसिस आणि मयंक अग्रवाल या नवीन कर्णधारांवर असणार आहे. परंतु कोहली आता नक्कीच लक्ष वेधून घेईल. कारण यंदा त्याच्याकडे संघाचे नेतृत्व नाही. तो 2012 मध्ये शेवटचा आरसीबी संघासाठी फक्त खेळाडू म्हणून खेळताना दिसला होता. त्यानंतर आता तो खेळाडू म्हणून मैदानात उतरेल.

RCB
RCB
author img

By

Published : Mar 27, 2022, 4:34 PM IST

नवी मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसरा सामना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स ( Royal Challengers Bangalore v Punjab Kings ) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना हा सामना डॉ. डी वाय. पाटील स्टेडियमवर पार पडेल. या सामन्यासाठी आरसीबी संघाची धुरा फाफ डु प्लेसिसच्या तर पंजाबची मंयक अग्रवालच्या हाती असणार आहे. तसेच कर्णधारपद सोडल्याने विराट कोहलीच्या फलंदाजीवरील भार कमी होऊ शकतो. परंतु रविवारी येथे पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल-15 च्या सलामीच्या सामन्यात लक्ष केंद्रित केले जाईल.

कारण, जवळपास दशकभरानंतर प्रथमच कोहली आरसीबीचे नेतृत्व करणार ( Kohli will not lead the RCB ) नसून, तो केवळ एक खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल. तथापि, कर्णधारपदाचा त्याग केल्याने कोहलीचे लक्ष कोणत्याही प्रकारे विचलित होणार नाही, जो आपला स्वत:चा शोध पुन्हा घेऊ इच्छितो. शनिवारपासून मुंबईत सुरू झालेल्या 2022 च्या हंगामात फ्रँचायझीला प्रथमच विजेतेपद पटकावून देण्यासाठी उत्कृष्ट प्रदर्शन आणि आपली शक्ती प्रदान करण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहलीने 2013 साली डॅनियल व्हिटोरीकडून आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्यानंतर विराट कोहलीने आरसीबी संघाच्या कर्णधारपदाची धुरा आठ वर्ष वाहिली.

कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीची सर्वोत्तम कामगिरी 2016 मध्ये झाली होती. जेव्हा संघ उपविजेता ठरला आणि कर्णधाराने चार शतकांसह 900 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तरीही त्यांच्या पहिल्या विजेतेपदाकडे ते लक्ष ठेवून आहेत, दोन्ही संघ आपल्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात जोरदार सुरुवात करण्यास उत्सुक असतील.

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू डु प्लेसिस ( Veteran player du Plessis ), ज्याला आरसीबीने गेल्या महिन्यात आयपीएल मेगा लिलावात 7 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. शेवटच्या 14 हंगामात अपयशी ठरल्यानंतर, ते आपल्या पहिल्या विजेतेपदाचा शोधात आहेत. 37 वर्षीय डु प्लेसिसकडे जास्त हंगामाचा अवधि नसणार आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी उत्साही असणार आहे. तो नवीन कल्पना असलेला एक नवीन कर्णधार आहे. त्याचबरोबर त्याच्या नवीन कल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करेल. आरसीबीला पहिल्या काही सामन्यांमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड या ऑस्ट्रेलियन जोडीच्या अनुपस्थित उतरावे लागेल.

दुसरीकडे, किंग्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड कसोटी संघासोबत वेस्ट इंडिजमध्ये असलेल्या जॉनी बेअरस्टो आणि कागिसो रबाडा यांच्या शिवाय खेळावे लागेल. रबाडाने नुकतेच बांगलादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय सामना खेळला आहे. रबाडाच्या अनुपस्थितीत, त्यांचे गोलंदाजी आक्रमण कमजोर दिसत आहे. त्यांना आशा आहे की बॅकअप खेळाडू आरसीबीच्या मजबूत फलंदाजी युनिटविरुद्ध चांगली कामगिरी करतील. स्फोटक फलंदाज शाहरुख खानकडे देखील बरेच लक्ष दिले जाईल. ज्याला सर्व फॉरमॅटमधील देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पंधराव्या हंगामासाठी 9 कोटी रुपयांना लिलावात परत घेतले गेले होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जॅफेन बेंगलोर, जे. सुयश प्रभुदेसाई, छमा मिलिंद, अनिश्‍वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, लवनीथ सिसोदिया, सिद्धार्थ कौल.

पंजाब किंग्स : शिखर धवन, मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, रिटिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.