ETV Bharat / sports

Practice Match : भारताने घेतली 366 धावांची आघाडी, विराट कोहलीची फॉर्ममध्ये वापसी

author img

By

Published : Jun 26, 2022, 3:36 PM IST

कोहलीने 98 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार खेचले आणि जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर झेल ( Jaspreet Bumrah bowling was caught ) घेण्यापूर्वी त्याने 67 धावांची दमदार खेळी केली. कोहलीशिवाय अष्टपैलू जडेजा (56) आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (62) यांनी अर्धशतकांसह फलंदाजीचा सराव केला.

Virat Kohli
Virat Kohli

लीसेस्टर : अनेक दिवसांपासून लय शोधत असलेला भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ( Former captain Virat Kohli ) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 67 धावांची आकर्षक खेळी केली. 1 बाद 80 अशी दिवसाची सुरुवात केल्यानंतर भारताने खेळ संपेपर्यंत 92 षटकांत 7 बाद 364 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पहिला डाव 8 बाद 246 धावांवर घोषित केला, त्याला प्रत्युत्तरात लीसेस्टरशायरने 244 धावा केल्या होत्या.

कोहलीने 98 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला ( Jaspreet Bumrah bowling was caught ). कोहलीशिवाय अष्टपैलू जडेजा (56) आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (62) यांनी अर्धशतकांसह फलंदाजीचा सराव केला. या दोन्ही फलंदाजांनी मात्र बाद झाल्यानंतर पुन्हा फलंदाजी केली.

पहिल्या डावात लीसेस्टरशायरकडून फलंदाजी करणाऱ्या कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजाराने 53 चेंडूत 22 धावा केल्या, तर श्रीकर भरत (43), हनुमा विहारी (20) आणि शार्दुल ठाकूर (28) यांनीही चांगला फलंदाजीचा सराव केला. लिस्टरशायरकडून खेळणाऱ्या गोलंदाजांमध्ये नवदीप सैनीने तीन, तर जसप्रीत बुमराह, साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. कमलेश नागरकोटी यांना दोन यश मिळाले. त्यामुळे भारताने लीसेस्टरशायरविरुद्ध 366 धावांची आघाडी घेतली ( India lead Leicestershire by 366 runs ).

हेही वाचा - Rohit Sharma : रोहित शर्माला कोरोनाची लागण, उपचार सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.