ETV Bharat / sports

कोरोना काळात मदतीसाठी पुढे सरसावला ऋषभ पंत, ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पुरवणार - pant donates amount to procure oxygen cylinders

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या कोरोना विरुद्ध लढण्यासाठी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील सरसावला आहे.

pant-donates-undisclosed-amount-to-procure-oxygen-cylinders
कोरोना काळात मदतीसाठी पुढे सरसावला ऋषभ पंत, ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पुरवणार
author img

By

Published : May 8, 2021, 8:35 PM IST

मुंबई - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या कोरोना विरुद्ध लढण्यासाठी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील सरसावला आहे. पंतने स्वत: ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली.

पंतने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मित्रांनो, आपला देश निराशेतून जात आहे. याचं मला खूप वाईट वाटतं. मी अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना कोरोनामुळे गमावताना पाहिलं आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे आपल्यात नाहीत, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. लढाई जिंकण्यासाठी सांघिक कामगिरी महत्वाची असते, हे मी क्रिकेटमधून शिकलो आहे.

कोरोनाच्या महामारीचा सामना करण्यासाठी मी हेमकुंट या सेवाभावी संस्थेला आर्थिक मदत करत आहे. ही संस्था रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन बेड्स, कोरोना कीट यासारख्या वस्तू गरजूंना पुरवेल. ग्रामीण आणि निमशहरी भागात शहरांच्या तुलनेत वैद्यकीय सेवेचा अभाव असतो. त्यामुळे खेड्यातील आणि निमशहरी लोकांना मी मदत करणार आहे, असे देखील पंतने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतने वर्षभरापासून अविरत न थकता कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्धांचे आभार मानले आहेत. तसेच त्याने इतरांना देखील गरजूंना मदत करण्याचे आवाहन केलं आहे. याशिवाय त्याने, कोरोना विरुद्धचा लढा देण्यासाठी जनजागृती करावी. केंद्र आणि राज्य सरकारने लसीकरण कार्यकम सुरु केला आहे. याबाबत लोकांना जागृत करावं. तसेच स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी त्रिसूतीचा पालण करावं. शक्य झाली तेव्हा लस घ्यावी, असेही सांगितलं आहे.

हेही वाचा - हार्दिकला इंग्लंड दौऱ्यातून वगळलं, माजी निवडकर्ते प्रसाद म्हणाले...

हेही वाचा - 'देशाअंतर्गत स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत होतो, पण प्रसिद्धी IPLमुळे मिळाली'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.