कराची : सद्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका ( A three-match Test series ) खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना देखील अनिर्णीत राहिला. पाकिस्तानचे फलंदाज बाबर आझम ( Batsman Babar Azam ), अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्यांच्या दुसऱ्या डावात विक्रमी 172 षटके खेळून अनिर्णीत राखला.
-
King Babar shows his class as he saves the day for Pakistan
— PCB Media (@TheRealPCBMedia) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read more: https://t.co/IrQUCy2Hkv#PAKvAUS | #BoysReadyHain
">King Babar shows his class as he saves the day for Pakistan
— PCB Media (@TheRealPCBMedia) March 16, 2022
Read more: https://t.co/IrQUCy2Hkv#PAKvAUS | #BoysReadyHainKing Babar shows his class as he saves the day for Pakistan
— PCB Media (@TheRealPCBMedia) March 16, 2022
Read more: https://t.co/IrQUCy2Hkv#PAKvAUS | #BoysReadyHain
कर्णधार आझमच्या 196, शफीकच्या नाबाद 96 आणि रिजवानचे नाबाद 104 धावांच्या जोरावर पाकिस्तान सामना ड्रॉ केला. त्यामुळे या दोन संघातील तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. पहिले दोन्ही सामने अनिर्णीत राहिल्याने बेनौद-कादिर ट्रॉफीमध्ये ( Benaud-Qadir Trophy ) अद्याप कोणीही आघाडी घेतलेली नाही.
दुसऱ्या डावातील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी केलेल्या आझमने दोन दिवसांत 10 तासांपेक्षा जास्त वेळ फलंदाजी करून पाकिस्तानला पराभवापासून वाचवले ( Saved Pakistan from defeat ). पाचव्या दिवशी उरलेल्या 12 षटकांपूर्वीच बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आशेचा किरण मिळाला. पण नाबाद असलेल्या रिझवानने यजमानांना सामन्यात रोखून धरले आणि त्याने आपले शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा विजयापासून दूर ठेवले.
-
See you later, Karachi! 👋🏼 #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Aer9V356fD
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">See you later, Karachi! 👋🏼 #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Aer9V356fD
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 17, 2022See you later, Karachi! 👋🏼 #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Aer9V356fD
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 17, 2022
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 506 धावांच्या विशाल लक्ष्यापासून फक्त 63 धावा दूर असताना पाकिस्तानच्या चाहत्यांनी, त्यांच्या दुसऱ्या डावात 443/7 धावा झाल्यामुळे स्टँडवर आनंद व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाला 12.3 षटकात सहा विकेट्सची गरज असताना, नॅथन लियॉन (4/112) यांनी सुरेख गोलंदाजी करत आणखी दोन झटपट विकेट घेतल्याने पाकिस्तानचा डाव 414/7 असा झाला.
ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी ऑफस्पिनरने बाबरला 196 धावांवर बाद करण्यापूर्वी, कर्णधार कमिन्सने फहीम अश्रफला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. उस्मान ख्वाजाने त्याच्या चेंडूवर रिझवानला जीवदान दिले असले तरी मिच स्वॅपसनने एकही विकेट न घेता 152 धावा दिल्या. तिथून रिझवानने शेवटच्या षटकात आपले शतक पूर्ण केले आणि सामना अनिर्णित राहिला.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलियाने 556/9 डाव घोषित केला (उस्मान ख्वाजा 160, अॅलेक्स केरी 93, फहीम अश्रफ 2/55, साजिद खान 2/167) आणि 97/2. दुसरा डाव घोषित (मार्नस लॅबुशेन 44, उस्मान ख्वाजा नाबाद 44)
पाकिस्तान 148 (बाबर आझम 36, नौमान अली 20 मिचेल स्टार्क 3/29, मिचेल स्वीपसन 2/32) आणि 443/7 (बाबर आझम 196, अब्दुल्ला शफीक 96, मोहम्मद रिझवान नाबाद 104, नॅथन लायन 4/112, पॅट कमिन्स 2 /2) 75).