लाहोर: पाकिस्तान आणि इंग्लंड संघात सात सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सहावा सामना ( PAK vs ENG 6th T20I ) पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 8 विकेटसने धूळ ( Pakistan lost to England by 8 wickets ) चारली. त्याचबरोबर मालिकेत 3-3 ने बरोबरी केली. या सामन्यात सलामीवीर फिल सॉल्टने 88 धावांची ( Phil Salts half century ) आकर्षक खेळी करत बाबर आझमची 87 धावांची ( Babar Azams half century ) खेळीवर पाणी फेरले. सॉल्टने 41 चेंडूत नाबाद 88 धावा केल्याने इंग्लंडने केवळ 14.3 षटकात 2 बाद 170 धावा करून आरामात विजय मिळवला. इंग्लंडने अवघ्या 7 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या, यावरून इंग्लंडच्या फलंदाजीचा अंदाज लावता येतो.
तत्पूर्वी, बाबरच्या 59 चेंडूत नाबाद 87 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 6 बाद 169 धावा केल्या होत्या. या दोन संघांमधील सातवा आणि निर्णायक सामना आता रविवारी गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. सॉल्टने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजीचे चमकदार उदाहरण सादर केले. कारण इंग्लंडने पहिल्या सहा षटकात 1 बाद 82 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदाच इतक्या धावा दिल्या.
-
A dominant victory takes it to a decider! 🙌
— England Cricket (@englandcricket) September 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard: https://t.co/kKg4B1XiHZ
🇵🇰#PAKvENG 🏴 | @PhilSalt1 pic.twitter.com/7vWKJD1wDJ
">A dominant victory takes it to a decider! 🙌
— England Cricket (@englandcricket) September 30, 2022
Scorecard: https://t.co/kKg4B1XiHZ
🇵🇰#PAKvENG 🏴 | @PhilSalt1 pic.twitter.com/7vWKJD1wDJA dominant victory takes it to a decider! 🙌
— England Cricket (@englandcricket) September 30, 2022
Scorecard: https://t.co/kKg4B1XiHZ
🇵🇰#PAKvENG 🏴 | @PhilSalt1 pic.twitter.com/7vWKJD1wDJ
अॅलेक्स हेल्सने ( Alex Hales ) अवघ्या 12 चेंडूत 27 धावा केल्या आणि सॉल्टसोबत पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. यानंतर डेव्हिड मलान (18 चेंडूत 26) आणि बेन डकेट (16 चेंडूत नाबाद 26) यांनी सॉल्टला चांगली साथ दिल्याने इंग्लंडने 33 चेंडू राखून विजय मिळवला. सॉल्टने पहिल्या पाच सामन्यांमध्ये केवळ 59 धावा केल्या होत्या, परंतु पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्धच्या या सामन्यात त्याने 13 चौकार आणि तीन षटकार मारत घरच्या संघाच्या चाहत्यांसमोर निर्दयीपणा दाखवला.
तत्पूर्वी, पाकिस्तानला या सामन्यात विश्रांती देण्यात आलेल्या मोहम्मद रिझवानची ( Mohammad Rizwan ) उणीव भासली. त्याच्या जागी आलेला यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद हरिसने पदार्पणाच्या सामन्यात केवळ सात धावा केल्या. कॅप्टन बाबरने एक टोक धरले. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. त्याच्याशिवाय इफ्तिखार अहमदने 31 धावांचे योगदान दिले.
हेही वाचा - New Rules of Cricket :आजपासून बदलणार क्रिकेटचे 'हे' नियम, टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिसणार अनेक बदल