ETV Bharat / sports

Warner-Afridi Viral video: पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात वॉर्नर आणि आफ्रिदीची जुगलबंदी; पहा 'हा' व्हिडिओ - क्रिकेटचा व्हायरल व्हिडिओ

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी एकमेकांना ( Viral video of Warner and Afridi ) खुन्नस देताना दिसत आहे. या व्हिडिओवर लोकांनी नेक मीम्स आणि जोक्स बनवून व्हायरल केले आहेत.

Warner-Afridi
Warner-Afridi
author img

By

Published : Mar 25, 2022, 2:18 PM IST

हैदराबाद: पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Pakistan vs Australia ) संघात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात एक घटना अशी घडली आहे की, ज्यामुळे डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी ( David Warner and Shaheen Afridi ) सोशल मीडियावर मोठ्या ट्रोल होत आहे. तसेच या दोघांचा एकमेकांना खुन्नस देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी त्यांचा हा व्हिडिओ एडिट करुन अपलोड केला आहे, तो देखील तितकाच व्हायरल होत आहे.

वास्तविक ही घटना तेव्हाची आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ( Australia second innings ) शाहीन आफ्रिदीने डेव्हिड वॉर्नरला एक चेंडू टाकला, ज्यावर वॉर्नरने बचाव केला. परंतु फॉलो-थ्रू पूर्ण केल्यानंतर शाहीन आफ्रिदी थेट डेव्हिड वॉर्नरकडे गेला आणि त्याला खुन्नस देऊ लागला. यानंतर दोघेही एकमेकांच्या बाजूला उभे राहिले आणि नंतर हसत हसत पुढे गेले. मात्र दोघांचा हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनी या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा आफ्रिदीने शॉर्ट बॉल टाकला आणि वॉर्नरने त्याचा बचाव केला. त्यानंतर तो 'नो रन' म्हणाला. पण चेंडू फेकल्यानंतर आफ्रिदी त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये वॉर्नरकडे गेला, दोघेही एकमेकांजवळ उभे एकमेकांकडे पाहत राहिले. मात्र, नंतर दोघेही एकमेकांना पाहून हसले. पण या दोघांच्या या फोटोचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला सुरु आहे. लोक या फोटोचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावर यावर अनेक मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दोघांचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि मार्नस लॅबुशेन ( Pat Cummins and Marnus Labuschen ) देखील हसताना दिसत होते. त्याच वेळी, वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ कसा व्हायरल केला, मीम्स कसे व्हायरल झाले ते पहा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.