ETV Bharat / sports

पाकिस्तान सुपर लीगवर सट्टेबाजी करताना विद्यार्थ्याला अटक - betting on psl 2021 at nagpur

पाकिस्तान सुपर लीगच्या टी-20 क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी (खायवाडी) लावणाऱ्या एका आरोपीला नागपूर शहर पोलीस विभागाच्या झोन-२ च्या विशेष पथकाने रंगेहात अटक केली आहे. शुभम कुमार शंकरलाल राय असे आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेश येथील शिवनीचा रहिवासी आहे.

one student arrested for betting on pakistan super league 2021 at nagpur
पाकिस्तान सुपर लीगवर सट्टेबाजी करताना विद्यार्थ्याला अटक
author img

By

Published : Jun 16, 2021, 3:06 PM IST

नागपूर - पाकिस्तान सुपर लीगच्या टी-20 क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी (खायवाडी) लावणाऱ्या एका आरोपीला नागपूर शहर पोलीस विभागाच्या झोन-२ च्या विशेष पथकाने रंगेहात अटक केली आहे. शुभम कुमार शंकरलाल राय असे आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेश येथील शिवनीचा रहिवासी आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी शुभम हा शिक्षणासाठी नागपुरला आला होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात तो सट्टेबाजीच्या अवैध धंद्यात सक्रिय झाला होता, अशी माहिती डीसीपी विनिता साहू यांनी दिली आहे.

डीसीपी विनिता साहू यांना गोपनीय माहिती मिळाली की, सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरे टाउन येथील सदाशिव अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये शुभम कुमार राय ( वय २४) हा पाकिस्तान सुपर लीगच्या टी-20 क्रिकेट मॅचवर सट्टाबाजी करीत आहे. या माहितीच्या आधारे डीसीपी झोन-2 च्या विशेष पथकाला करवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलीस पथकाने संपूर्ण परिसराची रेकी केल्यानंतर शुभमच्या फ्लॅटवर धाड टाकण्यात आली. तेव्हा तो पाकिस्तान सुपर लीगच्या लाहोर विरुद्ध क्वेटा या सामन्यात ऑनलाइन खायवडी करताना आढळून आला. पोलिसांनी आरोपी शुभमला कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये अटक करण्यात आली आहे.

सट्टेबाजीसाठी उपयोगात येणारे साहित्य जप्त -
पोलिसांनी आरोपी शुभम कडून ०७ मोबाईल, ०३ टॅब, ०१ मॅक बुक, ०१ टीव्ही सेट ऑफ बॉक्ससह, १ हार्ड डिस्क, १ पोलो वोस्क वॅगन कार आणि 67 हजारांची रोख रक्कम असा एकूण 5 लाख 27 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विद्यार्थी ते सट्टेबाज -
शुभम कुमार शंकरलाल राय हा मध्य प्रदेश येथील शिवनीचा रहिवासी आहे. तो शिक्षणासाठी शिवानी वरून नागपूरला आला होता. तो सीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचे आई वडील शेतकरी असून अतिशय सामान्य कुटुंबाशी त्याचे नाते आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी सुरू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान पैसे नसल्याने शुभम सट्टेबाजीचा अवैध धंद्यात सक्रिय झाला होता, अशी माहिती पुढे आली आहे

हेही वाचा - WTC Final : केएल राहुल, मयांक अगरवाल यांना विश्रांती तर या 15 शिलेदारांची निवड

हेही वाचा - युजवेंद्र चहल घेतोय पत्नी धनश्रींकडून डान्सचे धडे, खास व्हिडीओ शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.