क्राइस्टचर्च (न्यूझीलंड) : टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा सामना मंगळवारी 28 मार्चला दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा एकदिवसीय सामना न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने शानदार विजय मिळवला होता.
न्यूझीलंडची मालिकेची विजयी सुरुवात : श्रीलंकेच्या न्यूझीलंड दौऱ्यात किवींनी अद्याप एकही सामना गमावलेला नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने श्रीलंकेचा व्हाईटवॉश केला. तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्यांना 198 धावांनी हरवून एकदिवसीय मालिकेची विजय सुरुवात केली. या सामन्यात न्यूझीलंडकडून फिन ऍलनने 51 धावांची शानदार खेळी केली. त्याला डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र यांनी चांगली साथ दिली. किवींनी पहिल्या डावात 274 धावा केल्या आणि हेन्री शिपलीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी लक्ष्याचा चांगला बचाव केला. शिपलीने 7 षटकांत 31 धावा देत 5 बळी घेतले.
श्रीलंकेचा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश : दुसरीकडे, श्रीलंकेला 2023 च्या आयसीसी विश्वचषकापूर्वी आपला हरवलेला फॉर्म शोधायचा आहे. मात्र त्यांचा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश झाला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवातही निराशाजनक झाली. एकदिवसीय सामन्याच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेची गोलंदाजी आणि फलंदाजी ताकद दाखवू शकली नाही. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक 18 धावा केल्या होत्या. श्रीलंका त्यांच्या टी 20 मालिकेपूर्वी ही एकदीवसीय मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
येथे पहा लाइव्ह सामना : यापूर्वी, न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली आहे. न्यूझीलंडने पहिला कसोटी सामना दोन गडी राखून जिंकला होता. ही कसोटी मालिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळली गेली होती. या एकदिवसीय सामन्याचे भारतात थेट प्रक्षेपण होणार नाही. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर तुम्ही हा सामना लाइव्ह पाहू शकता.