ऑकलंड: पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ( Birmingham Commonwealth Games ) न्यूझीलंडने नवीन महिला क्रिकेट संघाची घोषणा केली ( New Zealand Cricket Announces New Team ) असून, चार महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने (NZC) जाहीर केलेल्या खेळाडूंच्या करार यादीत एमी सॅटरथवेटचे नाव नाही. सॅटरथवेटला याची माहिती मिळताच तिने काही दिवसांपूर्वी निवृत्ती जाहीर केली आहे.
केटी मार्टिन, ली ताहुहू, फ्रँकी मॅके आणि लेह कॅस्परेक यासारख्या दिग्गज खेळाडूंनाही NZC च्या यादीतून वगळण्यात आले आहे. बॅट्समन जॉर्जिया प्लिमर, फिरकीपटू इडन कार्सन आणि यष्टिरक्षक इझी गेज आणि जेस मॅकफॅडन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी, अनुभवी कर्णधार सोफी डिव्हाईनची ( Veteran captain Sophie Devine ) न्यूझीलंडच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. 1998 मध्ये क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या 50 षटकांच्या सामन्यानंतर राष्ट्रकुल खेळांचा भाग होण्यासाठी मी उत्साहित असल्याचे डिव्हाईनने सांगितले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसारख्या जागतिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला महिला क्रिकेट संघ बनणे हा खरोखरच सन्मान आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी डिव्हाईनच्या हवाल्याने सांगितले की, न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ डेव्हिड व्हाईट ( New Zealand Cricket CEO David White ) यांच्या मते राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटची पुनरावृत्ती ही महिलांच्या खेळांना प्रोत्साहन देण्याची उत्तम संधी आहे. कॉमनवेल्थ गेम्सची सुरुवात 29 जुलैपासून एजबॅस्टनमध्ये होणार आहे.
न्यूझीलंड संघात सुझी बेट्स, ईडन कार्सन, सोफी डिव्हाईन, लॉरेन डाउन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रुक हॉलिडे, हेली जेन्सन, फ्रॅन जोनास, जेस केर, अमेलिया केर, रोझमेरी मायर, जेस मॅकफॅडन, जॉर्जिया प्लिमर आणि हॅना रोवे यांचा समावेस आहे.
हेही वाचा - Mithali Raj Announced Retirement : भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा